शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोगाचे ४४८ तर कुष्ठरोगाचे ७८३ संशयित रुग्ण आढळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 11:06 IST

448 suspected TB patients and 783 suspected leprosy patients found: ३१ ऑक्टोबरपर्यंत १०.६२ लाख नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहिमेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २.६९ लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी क्षयरोगाचे ४४८, तर कुष्ठरोगाचे ७८३ संशयित रुग्ण आढळले असून, २७ क्षयरुग्ण, तर ११ कुष्ठरुग्ण असल्याचे निदान झाले. ३१ ऑक्टोबरपर्यंत १०.६२ लाख नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना शोधून व संशयित क्षयरुग्णांची एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करून रोगाचे निदान व औषधोपचार केला जाणार आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत प्राथमिक स्थितीत नवीन विनाविकृती कुष्ठरुग्ण शोधून त्याला पूर्ण कालावधीचा मोफत औषधोपचार देणे तसेच विकृती प्रतिबंध करणे आणि समाजातील कुष्ठरोग व क्षयरोगाच्या संसर्गाची साखळी खंडित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत १० लाख ६२ हजार ८७१ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. यामध्ये शहरी भागातील ७३०१७ तर ग्रामीण भागातील ९८९८५४ नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक अशा एकूण १०३९ जणांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत २.६९ लाख नागरिकांची तपासणी झाली आहे. यापैकी क्षयरोगाचे ४४८, तर कुष्ठरोगाचे ७८३ संशयित रुग्ण आढळले. यापैकी २७ जणांना क्षयरोग तर ११ जणांना कुष्ठरोग असल्याचे निदान झाले. या सर्व रुग्णांना उपचाराखाली ठेवण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान गृहभेटीकरिता येणा-या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.व्ही. देशपांडे यांनी केले.

 

संयुक्त सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहिमेंतर्गत जिल्ह्यात १० लाख ६२ हजार ८७१ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. आतापर्यंत केलेल्या तपासणीतून क्षयरोगाचे ४४८ तर कुष्ठरोगाचे ७८३ संशयित रुग्ण आढळले. यापैकी २७ जणांना क्षयरोग तर ११ जणांना कुष्ठरोग असल्याचे निदान झाले असून या सर्व रुग्णांना उपचाराखाली ठेवण्यात आले आहे. - डॉ. एस.व्ही देशपांडेजिल्हा क्षयरोग अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य