शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

४२ कोटीतून साकारणार सिंचन विहिरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 15:21 IST

वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षात पात्र लाभार्थ्यांना नवीन सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्यासाठी पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांना ४२ कोटींचा निधी मिळाला आहे.

वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षात पात्र लाभार्थ्यांना नवीन सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्यासाठी पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांना ४२ कोटींचा निधी मिळाला आहे. या योजनेची अंमलबजावणी तातडीने सुरु करण्याच्या सूचनाही कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत.राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करून जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून विशेष घटक योजना सुधारीत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राज्यात राबविण्यात येत आहे. १.५० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाºया अनु.जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती, इनवेल बोअरिंग, वीजजोडणी, पंप संच, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच आदी बाबींसाठी जवळपास अनुदान दिले जाते. सन २०१९-२० या आर्थिक वर्षाला सुरूवात होऊन साडेतीन महिने उलटले आहेत. साडेतीन महिन्यानंतर या योजनेंतर्गत सिंचन विहिरी व सिंचन साहित्यासाठी एकूण २७३.६२ कोटी रुपये निधीच्या कार्यक्रम अंमलबजावणीस कृषी व पशुसंवर्धन विभागाने १५ जुलै रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. संबंधित जिल्हा परिषदांना लवकरच निधी वितरीत केला जाणार असून, अंमलबजावणीस वित्तीय मान्यता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून घेण्यात येणार आहे. पश्चिम वºहाडातील वाशिम जिल्ह्यासाठी १५.१५ कोटी, अकोला जिल्ह्यासाठी १० कोटी व बुलडाणा जिल्ह्यासाठी १७.३२ कोटी रुपये मिळणार आहेत. लाभार्थी निवडीसाठी नवीन विहिरीसाठी किमान ०.४० हेक्टर तसेच नवीन विहिर खोदणे ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबींसाठी किमान ०.२० हेक्टर तसेच कमाल ६ हेक्टर क्षेत्र मर्यादा लागू राहणार आहे. कृषी गणनेनुसार जिल्ह्यातील एकूण अनु.जाती प्रवर्गातील शेतकºयांपैकी संबंधित तालुक्यातील सदर प्रवर्गाच्या शेतकºयांच्या संख्येच्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यांचा आर्थिक लक्ष्यांक निश्चित करावा, अशा सूचनाही कृषी विभागाने जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्याला १५.१५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार वाशिम जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.- प्रल्हाद शेळके,कृषी विकास अधिकारीजिल्हा परिषद, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना