शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

राज्यातील ४०७ शेतकरी गटांना प्रलंबित निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:24 IST

कृषी विभागाने १४ मार्च रोजी १० कोटींच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे.

वाशिम : गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे या योजनेंतर्गत राज्यात सन २०१७-१८ मधील १९६ आणि सन २०१८-१९ मधील २११ अशा एकूण ४०७ गटांची निवड झाली होती. तथापि पुरेसा निधी नसल्याने शेतकरी ृगटांची प्रस्तावित कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. सदर कामे पूर्ण होण्यासाठी कृषी विभागाने १४ मार्च रोजी १० कोटींच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे. यामुळे वाशिम जिल्ह्यातील तीन शेतकरी गटासह राज्यातील ४०७ गटांची उर्वरीत कामे पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.पीक उत्पादन वाढविण्यासाठी निविष्ठा, प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, काढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पणन आदी बाबी महत्वाच्या ठरतात. राज्यातील शेतकऱ्यांची जमिनधारणा कमी असल्याने शेतकºयांच्या उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी सामुहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पद्धती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता लक्षात घेता, राज्यात ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गटशेतीस चालना देणे’ ही योजना सन २०१७-२०१८ पासून राबविण्यात येत आहे. प्रकल्प आराखड्यानुसार शेतकरी गटांना प्रस्तावित कामे करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. राज्यात सन २०१७-१८ या वर्षात १९६ आणि २०१८-१९ या वर्षात २११ शेतकरी गटाची निवड झाली होती. प्रकल्प आराखड्यातील कामांसाठी यापूर्वी ६० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. उर्वरीत १० कोटींचा निधी मिळण्यास विलंब झाल्याने शेतकरी गटांची उर्वरीत कामे खोळंबली होती. उर्वरीत निधी देण्याची मागणी शेतकरी गटांनी कृषी विभागाकडे केली होती. शेतकरी गटांची मागणी लक्षात घेता राज्याच्या कृषी विभागाने १४ मार्च रोजी १० कोटींच्या निधी वितरणास मान्यता दिली. यामुळे वाशिम जिल्ह्यातील तीन गटासह राज्यातील ४०७ शेतकरी गटांची प्रकल्प आराखड्यातील पुढील कामे मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शासन निर्णयानुसार वाशिम जिल्ह्यात पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना