शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ११ दिवसात वाढले ४०४ कोरोना रुग्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 13:01 IST

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासियांची चिंता अधिकच वाढली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आॅगस्ट महिन्याच्या सुरूवातीच्या ११ दिवसात तब्बल ४०४ रुग्णांची भर पडल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासियांची चिंता अधिकच वाढली. एकिकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तर दुसरीकडे बाजारपेठेत नागरिकांची गर्दीही कायम असल्याचे दिसून येते. नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिकच तेजीत असून, आॅगस्ट महिन्यात सुरूवातीच्या ११ दिवसात तब्बल ४०४ रुग्ण आढळून आले. आता कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ९९८ वर पोहोचली असून यापैकी ३५१ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. बाहेरगावावरून परतणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी मेडशी येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. मे महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. जून, जुलै महिन्यात रुग्णसंख्या वाढली असून, आॅगस्ट महिन्यात यामध्ये अधिक झपाट्याने वाढ झाली. १ ते ११ आॅगस्ट या ११ दिवसात तब्बल ४०४ रुग्ण वाढले आहेत. तालुकास्तरावर संदिग्ध रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमुने घेतले जात आहेत. सध्या १३० संदीग्ध रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. ९९८ पैकी ३५१ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. १८ जणांचा मृत्यू, एकाची आत्महत्या तर ६२८ लोक बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक दक्ष राहावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला.

असे वाढले रुग्णआॅगस्ट महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. १ आॅगस्ट रोजी २६, २ आॅगस्ट रोजी ४१, ३ आॅगस्ट रोजी ९२, ४ आॅगस्ट रोजी ३२, ५ आॅगस्ट रोजी पाच, ६ आॅगस्ट रोजी २३, ७ आॅगस्ट रोजी ५७, ८ आॅगस्ट रोजी ३४, ९ आॅगस्ट ३१, १० आॅगस्ट रोजी २१ आणि ११ आॅगस्ट रोजी ४२ असे ११ दिवसात ४०४ रुग्ण वाढले आहेत. यामध्ये ५ आॅगस्टचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व दिवशी दोन आकड्यात रुग्णसंख्या वाढली. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, प्रतिबंधित क्षेत्रात तपासणी सुरू आहे.

 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या