शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील सिंचन विकासाकरिता ३६.९२ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 12:21 IST

Washim News जिल्ह्यासाठी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याची ही चांगली घटना आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मोडकळीस आलेल्या व नादुरुस्त असलेल्या गाव तलाव, पाझर तलाव तसेच कोल्हापुरी बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन केल्यास शेती व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल,  ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वेळोवेळी  निधीची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाकडून अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील २१७ योजनांकरिता ५३.३६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. विशेष बाब म्हणजे या पाचही जिल्ह्यांत एकट्या वाशिम जिल्ह्यासाठी चंद्रकांत ठाकरे यांच्या मंत्रालयीन स्तरावरील स्नेहामुळे एकट्या वाशिम जिल्ह्यासाठी ३६.९२ कोटींचा भरीव निधी मंजूर झाल्याची ही पहिलीच घटना आहे. जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय शेती व शेतीशी निगडित व्यवसाय आहे,  परंतु जिल्ह्यातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अद्यापही जिल्ह्यात सिंचनाच्या उत्तम सोयी-सुविधा उपलब्घ नसल्याने शेती तोट्याची होत चालली आहे. परिणामी अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आजही शासन दरबारी मागास जिल्हा म्हणून वाशिम जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्याचा मागासलेपणाचा डाग पुसण्यासाठी व जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याची नितांत गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी आपल्या संकल्पनेतून जिल्ह्यात सिंचनाची भरीव कामे केलीत. परंतु आजही सिंचन क्षेत्रात विविध विकासकामे करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी जिल्ह्यातील सिंचन क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरूच आहे. सद्य:स्थितीत जे प्रकल्प नादुरुस्त आहेत, मोडकळीस आलेले आहेत, पाण्याचा साठा कमी व गाळाचे प्रमाण अधिक आहे, अशा प्रकल्पांची माहिती घेऊन अशा प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करून जिल्ह्यात सिंचन क्षमता वाढविण्यास नक्कीच मदत होईल, ही बाब लक्षात घेऊन सिंचन प्रकल्पांच्या विकासाकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या मागणीची दखल घेत शासनाने तातडीने २० जानेवारी २०२० रोजी शासन निर्णय काढून जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्पासह सिंचन क्षेत्राच्या विकासाकरिता ३६.९२ कोटींचा भरीव निधी मंजूर केला आहे. प्रथमच जिल्ह्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याची ही चांगली घटना आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प