लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या झोपडपट्टी मुक्त योजनेअंतर्गत शहरातील पंचशिलनगर भागात बांधण्यात आलेली घरकुले गेल्या दोन वषार्पासून धुळखात पडली असून, सदर घरकुलांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यानंतरही ही घरकुले अद्याप लाभार्थींना देण्यात आलेली नाहीत. वाशिम नगर पालिकेअंतर्गत गरीब लोकांसाठी घरकुले बनविण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. या योजनेअंतर्गत पंचशिलनगर येथे एकूण ३५० घरकुले बांधण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात व राज्यात झोपडपट्टी मुक्त करण्याचा संकल्प केला आहे; परंतु वाशिम नगर पालिकेने गेल्या दोन वषार्पासून घरकुले तयार झालेली असतानाही गरिबांना घरकुलांचे वाटप करण्यात आले नाही. सदर घरकुलांमध्ये अवैध धंदे सुरु आहेत. घरकुलांची दारे, खिडक्या आदिंची मोडतोड झाली आहे. या प्रकारामुळे शासनाने दिलेल्या निधीचा अपव्यय झाला या घरकुल योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार तर झाला नाही ना, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी या प्रकाराची चौकशी करण्याची गरज आहे.
वाशिम शहरातील ३५० घरकुले दोन वर्षांपासून धुळखात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 20:24 IST
वाशिम: शासनाच्या झोपडपट्टी मुक्त योजनेअंतर्गत शहरातील पंचशिलनगर भागात बांधण्यात आलेली घरकुले गेल्या दोन वषार्पासून धुळखात पडली असून, सदर घरकुलांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यानंतरही ही घरकुले अद्याप लाभार्थींना देण्यात आलेली नाहीत.
वाशिम शहरातील ३५० घरकुले दोन वर्षांपासून धुळखात!
ठळक मुद्देझोपडपट्टी मुक्त शहर योजनेंतर्गत बांधण्यात आली होती घरकुलेजिल्हाधिका-यांना दखल घेण्याची गरज