शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावातील ३५ कोटींची पाणीपुरवठा योजना अडकली लालफितशाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 17:44 IST

मालेगाव (वाशिम) : पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी प्रस्तावित केलेली ३५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना लालफितशाहीत अडकली आहे.

- अमोल कल्याणकरलोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव (वाशिम) : पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी प्रस्तावित केलेली ३५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना लालफितशाहीत अडकली आहे. शहराला अद्याप एकाच जलकुंभातून आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया चाकातिर्थ प्रकल्पात अल्प जलसाठा असून यापुढे १० दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मालेगाव ग्राम पंचायतचे नगर पंचायतमध्ये रुपांतर होऊन तीन वर्षांंचा कालावधी उलटला आहे. शहराची लोकसंख्या वाढली असून, त्या तुलनेत शहरातील भौतिक व मुलभूत सुविधांत मात्र फारशी सुधारणा झाली नाही. दरवर्षी उन्हाळ्यात शहरवासियांवर पाणीटंचाईचे संकट असते. यावर्षीदेखील शहरवासी पाणीटंचाईला सामोेरे जात आहेत. शहराला गेल्या २५ वर्षांपासून पाणी पुरवठा करण्यासाठी एकच जलकुंभ असून, या जलकुंभातून एकाच वेळी संपूर्ण शहरवासियांना पुरेसा पाणी पुरवठा होणे शक्य नाही. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणाºया प्रकल्पातही कमी जलसाठा असतो. त्यामुळे उन्हाळाभर नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गतवर्षी अपुºया पावसामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचे चटके सोसावे लागले होते. त्यावेळी चाकातिर्थ प्रकल्पावरून कुरळा प्रकल्पापर्यंत पाणी आणून, नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरती योजना सुरू करण्यात आली. ती योजनाही फारसी उपयुक्त ठरली नाही. प्रत्यक्षात मालेगाव शहराची पाणीटंचाई कायम मिटविण्यासाठी प्रशासनाने ३५ कोटींची योजना प्रस्तावित केली आहे. तथापि, या योजनेचे कोणतेही काम अद्याप सुरू झाले नाही. यावर्षीतर पाणीटंचाईने भीषण स्वरुप धारण केले आहे. तालुक्यातील प्रकल्पांनी तळ गाठला आहे. चाकातिर्थ प्रकल्पातही पुरेसा प्रमाणात जलसाठा नसल्याने शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट आहे. सध्या आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. येत्या काही दिवसात दहा दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ३५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक ठरत आहे. 

मालेगाव शहरात यंदा पाणीटंचाई भासणार नाही. यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू करून शहरात पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल तसेच ३५ कोटीच्या कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेसाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. - रेखा अरूण बळीनगराध्यक्ष, मालेगाव

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई