शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड येथे स्वस्त धान्य गोदामासाठी ३.३९ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 13:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड (वाशिम) : नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणातील अन्नधान्याच्या साठवुणकीसाठी रिसोड येथे ३ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणातील अन्नधान्याच्या साठवुणकीसाठी रिसोड येथे ३ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी केली जाणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी यासाठी पाठविलेल्या प्रस्तावानुसार शासनाच्या सार्वजनिके बांधकाम विभागाने ३ कोटी ३९ लाख ४६ हजार ६०० रुपयांच्या अंदाजपत्रकास गुरुवार २१ फेब्रुवारीच्या निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पुरवठा विभागाला अन्नधान्य साठवणूक करण्यासाठी पुरेशा क्षमतेची गोदामे नसल्याने अडचणी येत आहेत. रिसोड येथे ही समस्या जाणवत असल्याने आणि पर्यायी व्यवस्था करण्यात अडथळे उद्भवत असल्याने जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रिसोड येथे ३ हजार मेट्रिक टन साठवण क्षमतेचे गोदाम उभारण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर रिसोड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांनी तयार केलेल्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, तसेच रिसोड तहसीलदारांनी साक्षांकन केलेल्या गोदाम बांधकामाच्या अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली. या अंदाजपत्रकानुसार नियोजित जागा उपभोक्ता विभागाच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र मिळवून सदर गोदाम बांधकामाच्या निविदा प्रसिद्ध कराव्या लागणार आहेत. प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या नवीन गोदाम बांधकामासाठी निधी प्राप्त झाल्यानंतर शासकीय गोदामाचे काम तातडीने सुरू करून विहित मुदतीत पूर्ण केले जाणार आहे. सदर गोदामाचे बांधकाम प्रगतीपथावर असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधीक्षक अभियंत्यांना किमान तीन वेळा भेट देऊन कामाची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याची खात्री करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करावा लागणार आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड