शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ३२४ ग्रामपंचायत सदस्यांची पदे धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:10 IST

वाशिम जिल्ह्यातीलही तब्बल ३२४ ग्रामपंचायत सदस्यांनी सहा महिन्याची मुदत उलटूनही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींची पदे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे धोक्यात सापडली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळात यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरक्षित जागांवर निवडणूक लढणाºया व निवडून येणाºया लोकप्रतिनिधींना निवडणूक विभागाकडे पुढील सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारकच असल्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरूवार, २३ आॅगस्ट रोजी दिला. मात्र, राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच वाशिम जिल्ह्यातीलही तब्बल ३२४ ग्रामपंचायत सदस्यांनी सहा महिन्याची मुदत उलटूनही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. अशा लोकप्रतिनिधींची पदे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे धोक्यात सापडली असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळात यामुळे मोठी खळबळ माजली आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार निवडणूक लढणाºया व ती जिंकणाºया ज्या उमेदवारांकडे जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध नाही, त्यांना पुढील सहा महिन्यात ते सादर करणे बंधनकारक आहे. या मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित लोकप्रतिनिधीचे पद रद्द होऊ शकते. असे असतानाही राज्यातील महापालिका, नगर परिषद, ग्रामपंचायतीमधील निवडून आलेल्या हजारो सदस्यांनी सहा महिन्याची मुदत उलटूनही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या २३ आॅगस्टच्या निर्णयानंतर अशी पदे आता रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात नगर परिषद अथवा नगर पंचायतींमधील एकाही सदस्याचे जात पडताळणी प्रमापत्राचे प्रकरण प्रलंबित नसले तरी गेल्या सहा महिन्यात विविध स्वरूपातील कारणांमुळे तद्वतच जात पडताळणी समितीकडून वेळोवेळी पाठपुरावा करूनही संबंधितांनी त्याची पुर्तता न केल्याने ३२४ ग्रामपंचायत सदस्यांची प्रकरणे अद्याप प्रलंबित असून अशी पदे आता धोक्यात सापडली आहेत. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आलेल्या ३२४ लोकप्रतिनिधींची प्रकरणे जात पडताळणी विभागाकडे सद्या प्रलंबित आहेत. पुरेशी कागदपत्रे सादर न करणे यासह विविध स्वरूपातील त्रुटी असल्यानेच ही समस्या उद्भवली असून त्याचे निवारण करण्यासंबंधी संबंधितांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, त्याची दखल संबंधितांनी घेतली नाही.- सुनील वारेउपायुक्त, जात पडताळणी विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत