शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात कपाशीचे ३० हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 19:22 IST

वाशिम : कृषी विभागाने वाशिम जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, जवळपास ३० हजार हेक्टरवरील कपाशीला बोंडअळीचा फटका बसल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले. 

ठळक मुद्देकृषी विभागाचे सर्वेक्षण पूर्ण ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागाने वाशिम जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, जवळपास ३० हजार हेक्टरवरील कपाशीला बोंडअळीचा फटका बसल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले. यावर्षी शेतक-यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी बोंडअळीने हल्ला चढवून कापूस उत्पादक शेतक-यांच्या नाकीनऊ आणले. बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे (सर्वेक्षण) करण्याचे आदेश शासनाने कृषी विभागाला दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने आता सर्वेक्षण पूर्ण केले. वाशिम जिल्ह्यात ३० हजार ९२१ हेक्टरवर ११९३७ शेतकºयांनी कपाशीची लागवड केली होती. सुरुवातीला अपु-या पावसामुळे अडचणीत आलेल्या कपाशीच्या पिकाला परतीच्या पावसाने चांगलाच आधार दिला; परंतु ही कपाशी वेचणीवर येत असतानाच त्यावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला. बोंडअळीग्रस्त क्षेत्राचा सर्व्हे करण्याचे आदेश कृषी विभागाला प्राप्त झाल्यानंतर, शेतकºयांसह गावांतील पंचांना घेऊन तलाठी आणि कृषी सहाय्यक, कृषी विभागाच्या कर्मचा-यांनी कपाशीच्या शेतात भेटी देऊन पंचनामे केले. मानोरा तालुक्यात १३ हजार ३०१ हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण केले असता जिरायती भागातील १०२३ हेक्टर, तर बागायती भागातील १२२७८ हेक्टर क्षेत्रातील कपाशीचे बोंडअळीमुळे ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचे आढळले. मंगरुळपीर तालुक्यात १८७६ हेक्टरपैकी संपूर्ण क्षेत्र जिरायतीच असून, या सर्व क्षेत्रातील कपाशीला बोंडअळीचा फटका बसला, त्याशिवाय रिसोड तालुक्यात ५२३ हेक्टर जिरायती आणि वाशिम तालुक्यातील ६५२ हेक्टर क्षेत्रातील जिरायती भागातील कपाशीला बोंडअळीचा फटका बसला. मालेगाव तालुक्यात पेरणी केलेल्या १६५८.९ हेक्टर क्षेत्रापैकी जिरायती भागातील ९८.३३, तर बागायती क्षेत्रातील १५६०.६ हेक्टर क्षेत्रातील कपाशीला बोंडअळीचा फ टका बसला. कारंजा तालुक्यात सर्वाधिक १५६८२ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली असून, यापैकी जिरायती भागातील ७५२३.६१ हेक्टर कपाशीला बोंडअळीचा फटका बसला, असे सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले. सर्वेक्षणाचा हा अहवाल येत्या सोमवार किंवा मंगळवारी शासनाकडे पाठविला जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुण नियंत्रण अधिकारी डी.आर. साठे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमcottonकापूस