वाशिम: जिल्हा निर्मितीपासून अकोला येथील समाज कल्यारण विभागातून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येत होते.त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा व्याप वाढून अनेक प्रकरणे वषार्नुवर्षे प्रलंबित राहू लागली.परिणामी अनेकांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावे लागले.यावर उपाय म्हणून वाशीम जिल्ह्यात २२ नोव्हेंबर २०१६ पासून स्वतंत्र जात वैधता समिती नेमण्यात आली. मात्र, यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ३० एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील सुमारे ३०४५ जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव पडताळणी अभावी रखडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जात पडताळणी समिती "असून अडचण,नसून खोळंबा " झाल्याची ओरड नागरिकांमधून केल्या जात आहे.
वाशिम जिल्ह्यात ३ हजारावर जात पडताळणी प्रस्ताव प्रलंबित
By admin | Updated: May 4, 2017 14:26 IST