शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

वाशिम जिल्ह्यात २६६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यातून मुक्त!

By admin | Updated: January 29, 2017 02:45 IST

‘जलयुक्त शिवार’चा सकारात्मक परिणाम; गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाई कृती आराखडा ३.५१ कोटीने कमी.

सुनील काकडे वाशिम, दि. २८ जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे जिल्ह्यातील २६६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यातून मुक्त होणार आहेत. या योजनेच्या सकारात्मक परिणामामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई कृती आराखडा ३.५१ कोटीने कमी झाला आहे. 'पाणी अडवा-पाणी जिरवा', या संकल्पनेचा मूळ उद्देश डोळ्यासमोर सन २0१९ पर्यंत संपूर्ण राज्य पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने २0१५-१६ या सत्रापासून राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पहिल्यावर्षी जिल्ह्यातील २00 गावांचा यामध्ये समावेश झाला होता. वाशिम तालुक्यातील २६, रिसोड २७, मालेगाव २५, मानोरा ६१, मंगरूळपीर २७ आणि कारंजा तालुक्यातील ३४ गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. २0१६-१७ मध्ये जिल्ह्यातील १५४ गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली होती. जलयुक्त शिवारच्या या कामांमुळे अनेक प्रकल्प, हातपंप, विहीरी आदि जलस्त्रोतांमध्ये पाणीसाठय़ात वाढ झाली आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाईच्या उपाययोजनांवरील तरतूद देखील निम्म्यांपेक्षा कमी झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे. गतवर्षी ५६१ गावांमध्ये होती पाणीटंचाई!गतवर्षी जिल्ह्यातील ७९८ गावांपैकी ५६१ गावांमध्ये पाणीटंचाई जाहीर झाली होती. त्यानुसार, ५.६८ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करून ६५६ उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. यंदा मात्र २९५ गावांचाच पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात समावेश आहे. यासाठी २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.गतवर्षी ५६१ गावांमध्ये ६५६ उपाययोजना राबविण्यात आल्या. विहिरींमधील गाळ काढून खोलीकरण, प्रगतीपथावरील नळयोजना पूर्णत्वास नेणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, सिंचन विहिर विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिर खोदकाम, कुपनलिका खोदकाम यासह इतर महत्वाकांक्षी कामे झाली. - गतवर्षी शासन-प्रशासनाचे प्रयत्न तथा लोकसहभागातून युद्धस्तरावर झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे २५0 पेक्षा अधिक गावांना पाणीटंचाईच्या संकटातून मुक्ती मिळाली आहे. या सर्वेक्षणातूनच यंदाचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून याअंतर्गत २९५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवरून २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. - शैलेष हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम