शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ‘ऑनलाईन’ सर्वसाधारण सभेवर २५ सदस्यांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 11:55 IST

२५ सदस्यांनी बहिष्कार टाकत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा २ जुलै रोजी आॅनलाईन पद्धतीने (गुगल मीट) घेण्यात आली. दरम्यान, या आॅनलाईन पद्धतीच्या सभेवर २५ सदस्यांनी बहिष्कार टाकत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर फिजिकल डिस्टन्स्ािंगचे पालन म्हणून ही सभा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात आली. दरम्यान, अन्य जिल्हा परिषदांमध्ये सभागृहात सर्वसाधारण सभा होत असताना, वाशिम येथे आॅनलाईन सभा का? असा प्रश्न उपस्थित करून २५ सदस्यांनी या आॅनलाईन सभेला विरोध करीत बहिष्कार टाकला. यामध्ये भाजपा, जिल्हा जनविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीसह सत्ताधारी गटातील काही सदस्यांचा समावेश आहे.या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व अधिकारी सहभागी झाले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा प्रत्येक पं.स. स्तरावर करण्यात आली होती. सभेमध्ये जि.प. विद्यालय उंबर्डा बाजार ता. कारंजा येथे अकरावा वर्ग सुरु करणे, जिल्हा परिषद साखरा शाळा ता. वाशिम येथे वर्ग ९ ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. तीन वर्षावरील प्रलंबित देयकास मंजुरी मिळणे, जिल्हा परिषदेच्या स्वउत्पनाचे व खर्चाचे सन २०१९-२० चे सुधारित व सन २०२०-२१ चे मुळ अंदाजपत्रकास मान्यता प्रदान करणे, ७५ टक्क्े अनुदानावर दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे (विषयी) या योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता, सन २०१९-२० मधील अखर्चित निधीमधून सन २०२०-२१ मध्ये जिल्हा वार्षिक अनुसुचित जाती उपाययोजना अंतर्गत ७५ टक्क्े अनुदानावर १०+१ शेळी गट वाटप करणे (विषयी) ही योजना राबविण्यास सुधारीत प्रशासकीय मान्यता, स्थानिक संस्थामध्ये जैविक विविधता व्यवस्थापन समितीची स्थापना करणे, जिल्हयातील प्रा. आ. केंद्र व उपकेंद्र बांधकाम व दुरुस्ती आदींबाबत चर्चा झाली. २५ सदस्यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनविदर्भातील चंद्रपूर, नागपूर, अकोला अशा रेड झोनमध्येही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा या सभागृहात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून होत आहे. त्यामुळे वाशिम येथेही सभागृहात सभा घेण्यात यावी, अशी मागणी २५ जिल्हा परिषद सदस्यांनी केली. यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना (सामान्य प्रशासन) दिले. दरम्यान, आॅनलाईन सभा झाल्याने मालेगाव येथील कॅशबुक प्रकरण या सभेत चर्चेत येऊ शकले नाही.

 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद