शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

औषधींच्या किमतीत 25 टक्क्याने वाढ; रुग्णांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 12:21 IST

Drug prices अन्य औषधींच्या किमतीत सरासरी २० ते २५ टक्क्याने वाढ झाल्याने याचा भुर्दंड रुग्णांना बसत आहे.

- संतोष वानखडे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असून, यामधून विविध प्रकारची औषधीदेखील सुटू शकली नाही. वेदनाशामक गोळ्या, अस्थिरोग, शस्त्रक्रियेशी संबंधित औषधी व उपकरणे यासह अन्य औषधींच्या किमतीत सरासरी २० ते २५ टक्क्याने वाढ झाल्याने याचा भुर्दंड रुग्णांना बसत आहे. दुसरीकडे मधुमेह व रक्तदाब या आजाराशी निगडित औषधींच्या किमती जवळपास १० टक्क्याने कमी झाल्या आहेत. यंदा मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एप्रिल ते जून या कालावधीत कच्चा माल, वाहतुकीचा व कामगारांचा प्रश्न यामुळे बहुतांश कंपन्यांची उत्पादने प्रभावित झाली होती. यामध्ये आरोग्य विभागाशी निगडित काही औषधींचादेखील समावेश आहे. गत चार महिन्यांच्या कालावधीत वेदनाशामक गोळ्या, मलम, सर्दी, तापेच्या गोळ्या, अस्थिरोग व शस्त्रक्रियेशी संबंधित औषधी व उपकरणे आदींच्या किमतीत २० ते ३० टक्क्याने वाढ झाल्याने याचा भुर्दंड रुग्णांना बसत आहे.

या कारणास्तव वाढल्या किमतीलाॅकडाऊनच्य कालावधीत विविध कंपनींची उत्पादने प्रभावित झाली होती. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येते. ज्या औषधीला फारशी मागणी नव्हती त्याच्या किमतीत घट झाल्याचेही दिसून येते.

मधुमेह, रक्तदाबाशी संबंधित औषधींच्या किमतीत घट औषधींच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी आढावा घेऊन उपाययोजना केल्या जातात. मध्यंतरी रेमडेसिवर इंजेक्शनच्या किमती वाढल्या होत्या. त्यानंतर सरासरी २,३०० रुपये किंमत करण्यात आली. मधुमेह व रक्तदाब या आजाराशी संबंधित औषधींच्या किमतीत साधारणत: १० टक्क्याने घट झाल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले. कान, नाक, घसा, नेत्र या आजाराशी संबंधित बहुतांश औषधींच्या किमती जैसे थे आहेत.

लाॅकडाऊनच्या कालावधीत अनेक आजाराशी संबंधित औषधींच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. वेदनाशामक असलेली एका कंपनीची गोळी (टॅब्लेट) लाॅकडाऊनपूर्वी १४ रुपयांची होती. आता ही गोळी २२ रुपयाला विकली जात आहे. सर्दी, ताप, अस्थिरोग, शस्त्रक्रियेशी संबंधित औषधीच्या किमतीतदेखील वाढ झाल्याने याचा भुर्दंड रुग्णांना बसत आहे.- गजानन तुर्के, नागरीक वाशिम

विविध आजारांशी संबंधित औषधीच्या किमतीत नेहमीच चढ-उतार होत असतात. लाॅकडाऊनपूर्वी आणि लाॅकडाऊननंतर काही प्रकारच्या औषधीच्या किमतीत वाढ झाली तर काही प्रकारच्या औषधीच्या किमतीत घट झाल्याचे दिसून येते. विशेषत: मधुमेह व रक्तदाबाशी संबंधित औषधीच्या किमतीत घट झाली आहे.- राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशन, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमmedicinesऔषधं