शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २४० प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 18:56 IST

जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २४० प्रकरणे निकाली काढण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २४० प्रकरणे निकाली काढण्यात आली.अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. गो. बिलोलीकर होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, न्यायिक अधिकारी एस. एम. मेनजोगे, एस. पी. शिंदे, पी. एच. नेरकर, श्रीमती एस. व्ही. फुलबांधे, श्रीमती डॉ. यु. टी. मुसळे, जी. बी. जाणकार, एम. एस. पौळ, एस. पी. बुंदे, जिल्हा विधिज्ञ संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. बबनराव इंगोले आदी उपस्थित होते.राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे आपसात तडजोडीने निकाली काढून आपसी संबंध टिकवून ठेवण्याचे आवाहन यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बिलोलीकर यांनी केले. जिल्ह्यातील दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबित अशी एकूण ४७१४ प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी ठेवली होती. यामध्ये मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी स्वरुपाची प्रकरणे, हिंदू विवाह कायद्याअंतर्गत प्रकरणे, धनादेशाची प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखलपूर्व प्रकरणे व न्यायालयातील प्रलंबित अशी एकूण २४० प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच यावेळी १ कोटी २३ लक्ष ६० हजार ८४७ रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी न्यायिक अधिकारी, वकील संघ, सामाजिक कार्यकर्ते व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले. आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव देशपांडे यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालय