वाशिम : कोरोनाच्या काळात २४ तास सेवा देऊनही लसीकरणासंदर्भात औषध विक्रेत्यांसोबत दुजाभावाची वागणूक मिळत आहे. कोविड योद्धा म्हणून औषधी विक्रेत्यांच्या सेवेकडे सरकारने संपूर्णत: दुर्लक्ष केले असून, केंद्र व राज्य सरकारच्या या भूमिकेबाबत औषधी विक्रेत्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात यावे, अन्यथा संपावर जाण्याचा इशारा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
संपूर्ण देशात व राज्यात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला असून, औषधी विक्रेता व त्यांचे कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन २४ तास सेवा देत आहेत. औषधी विक्रेत्यांमुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात औषधी पुरवठा सुरळीत राहण्यात मोठी मदत होत आहे. कोरोना रुग्ण, तसेच नातेवाइकांसोबत औषधी विक्रेत्यांचा जवळून संपर्क येतो. असे असतानाही औषधी विक्रेते सेवा देत आहेत. कोरोनाच्या काळातील ही सेवा लक्षात घेता, औषधी विक्रेते व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप लसीकरणात प्राधान्य देण्यात आले नाही. सरकारच्या या भूमिकेबद्दल संताप व्यक्त करीत लसीकरणात प्राधान्य द्यावे, अन्यथा संपावर जाण्याचा इशारा औषध विक्रेता संघटनेने दिला.
000
बॉक्स
औषध विक्रेते, कुटुंबातील सदस्यांनाही कोरोना संसर्ग
कोरोना रुग्ण व नातेवाइकांशी जवळून संपर्क येत असल्याने, औषध विक्रेते, औषध विक्रेत्यांच्या कुटुंबातील सदस्य, तसेच कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्ग झालेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात मेडिकलशी संबंधित १७० पेक्षा अधिक जणांना कोरोना संसर्ग झाला, तसेच १३च्या आसपास मृत्यू झाले, असे महाराष्ट्र केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे विभागीय सचिव नंदकिशोर झंवर यांनी सांगितले.
००००
कोट बॉक्स
कोरोनाच्या काळात औषध विक्रेते हे २४ तास सेवा देत आहेत. केंद्र वा राज्य सरकारने कोविड योद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच, परंतु लसीकरणात साधे प्राधान्यही दिले नाही. कोरोना रुग्ण व नातेवाइकांशी जवळून संपर्क येत असल्याने लसीकरणात औषध विक्रेत्यांना प्राधान्य मिळावे, अशी संघटनेची मागणी आहे.
- नंदकिशोर झंवर
विभागीय सचिव, महाराष्ट्र केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन
००००
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत औषध विक्रेते हे २४ तास सेवा देत असल्याने, किमान लसीकरणात तरी औषध विक्रेते, तसेच या व्यवसायाशी संबंधित कर्मचाऱ्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून कार्यरत असतानाही औषध विक्रेत्यांना लसीकरणात प्राधान्य नसल्याने चुकीचा संदेश जात आहे.
- हुकुम पाटील तुर्के, औषध विक्रेते, वाशिम
००००
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते. फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून पहिल्या टप्प्यात औषध विक्रेते, मेडिकल स्टोअर्सशी संबंधित कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे अपेक्षित होते. मात्र, लसीकरण झाले नाही. किमान आता तरी औषध विक्रेते व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे.
- अनिल नेनवाणी, औषध विक्रेते, वाशिम
०००००
बॉक्स
कोरोना संसर्ग - १७०
मृत्यू - १३
००००
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण मेडिकल - ८००
मेडिकलवरील एकूण कर्मचारी - ३,२००