शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

परराज्य, महानगरात  गेलेले २२ हजार कामगार वाशिम जिल्ह्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 10:50 IST

परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील मजूर, कामगार आता जिल्ह्यात परतत असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम आरोग्य विभागाने उघडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने विविध कारणास्तव परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील मजूर, कामगार आता जिल्ह्यात परतत असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम आरोग्य विभागाने उघडली आहे. दरम्यान, अधिकृत परवानगी घेऊन जवळपास ४ हजार कामगार, मजूर जिल्ह्यात दाखल झाले तर उर्वरीत १८ हजार मजूर, कामगार हे छुप्या मार्गाने दाखल झाल्याचे आरोग्य तपासणी मोहिमेवरून दिसून येते.जिल्ह्यात रोजगारांचे स्त्रोत अपुरे असल्याने प्रामुख्याने शेती कामांवरच जिल्ह्यातील बहुतांश जनतेच्या संसाराचा गाडा चालतो. त्यातही जिल्ह्यात प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असल्याने खरीप हंगामानंतरच जिल्हाभरातील हजारो कामगार रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे आदी महानगरांसह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशात जातात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी लागण्यापूर्वी परजिल्हा, परराज्यात गेलेले जिल्ह्यातील २७ हजार ५०९ नागरिक जिल्ह्यात परतले होते. १० दिवसांपूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीतही परजिल्ह्यात अडकलेल्या मजुर, कामगारांना स्वजिल्ह्यात जाण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार जिल्ह्यात १७ मे पर्यंत २२ हजार ४५२ कामगार, मजूर परतले असून, या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

तपासणी करताना सावधगिरीडेंजर झोनमधून येणाऱ्या मजुरांची आरोग्य तपासणी करताना आरोग्य विभागातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुरक्षा किटचा अभाव असल्याने कर्मचारही दक्षता घेऊनच तपासणी करीत आहेत.

सर्वांची प्रकृती ठणठणीतआरोग्य विभागातर्फे आतापर्यंत १८ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असून, यापैकी तुर्तास तरी कुणाला कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या