शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

ऑईलअभावी २०१ रोहित्र धुळखात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 12:46 IST

Washim MSEDCL News सिलिकान ऑईलच उपलब्ध नसल्याने दुरुस्ती होऊनही ते शेतकऱ्यांना मिळू शकले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले २०१ रोहित्र ऑईलविना गेल्या काही महिन्यांपासून धुळखात पडले आहेत. शेतकरी हे रोहित्र मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत; परंतु रोहित्रासाठी आवश्यक सिलिकान ऑईलच उपलब्ध नसल्याने दुरुस्ती होऊनही ते शेतकऱ्यांना मिळू शकले नाहीत.शेतकºयांना सिंचनासाठी सुरळीत वीज पुरवठा व्हावा म्हणून महावितरणने जिल्ह्यातील जवळपास प्रत्येकच शिवारात कृषी फिडरवर रोहित्र बसविले आहेत. तथापि, यातील शेकडो रोहित्र नादुरुस्त असल्याने शेतकºयांना सुरळीत वीज पुरवठाच होऊ शकत नाही. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाभरात नादुरुस्त झालेले २०१ रोहित्र महावितरणने दुरुस्तीसाठी शेतकºयांच्या शेतातून काढून आणले. त्याबाबतचा अहवालही वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आला आणि रोहित्रांची दुरुस्तीही करण्यात आल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता आर. जे. तायडे यांनी दिली आहे. तथापि, या रोहित्रात टाकण्यासाठी आवश्यक आॅईलच उपलब्ध नसल्याने ते दुरुस्त होऊनही शेतकºयांच्या शेतात बसविल्या गेले नाहीत. त्यात १०० केव्हीएचे ५०, ६३ केव्हीएचे ४५, तर १०६ एसयूडीएस (लहान रोहित्र) रोहित्रांचा समावेश आहे. यामुळे खरीपातील कापूस पिकासह ऊस, पपई, केळी, हळद ही बहुविध पिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. शिवाय यंदाचा रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यात आले आहेत. या रोहित्रांसाठी २५ हजार लिटर आॅईलची मागणी वरिष्ठस्तरावर केली आहे; परंतु ऑईल उपलब्ध नसल्याने ते लावता येत नाहीत. दोन चार दिवसांत आॅईल उपलब्ध होण्याची शक्यता आहे.-आर. जे. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण वाशिमआमच्या शिवारातील रोहित्र २ महिन्यांपूर्वी नादुरुस्त झाले. त्यामुळे कापूस, ऊस, हळद, आदी पिके धोक्यात आली आहेत. तसेच मुबलक पाणी असतानाही रोहित्राअभावी रब्बी हंगामाची पेरणी अशक्य आहे.-लक्ष्मण इंगळे,शेतकरी, उमरा (शम), ता. वाशिम

 

टॅग्स :washimवाशिम