शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील मंगरूळपीरचे २० जण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:06 IST

यापैकी २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, एका अहवालासंदर्भात संभ्रम असल्याने तो परत पाठविला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका कोरोनाबाधित रुग्णासोबत मंगरूळपीर येथील २१ जणांनी प्रवास केल्याने या सर्वांचे थ्रोट स्वॅब नमुने २० व २१ मे रोजी तपासणीसाठी अकोला पाठविले होते. यापैकी २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, एका अहवालासंदर्भात संभ्रम असल्याने तो परत पाठविला जाणार आहे. २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला.इतर जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी ठेवण्यात जिल्हा प्रशासनासह आरोग्य व पोलीस यंत्रणेने यश मिळविले होते. अलिकडच्या काळात परराज्यातून येणाºया मजूर, कामगारांमुळे जिल्ह्यातील संदिग्ध रुग्णांची संख्या वाढत होती. मालेगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या ‘हाय-रिस्क’ संपर्कातील पाच जण कोरोनाबाधित तर एक बालक निगेटिव्ह आले होते. सहा कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका जणाला १९ मे रोजी कोरोनासंसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. या रुग्णाच्या संपर्कात मंगरूळपीर येथील २१ जण आले आहेत. या २१ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले होते. यापैकी २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरीत एक अहवाल हा पॉझिटिव्हही नाही किंवा निगेटिव्हही नाही. त्यामुळे हा नमुना पुन्हा पाठविण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी सांगितले.आता जिल्ह्यातील अन्य भागातील सात संदिग्ध रुग्णांचे रुग्णांचे अहवाल प्रलंबित असून, सदर अहवाल २३ मे रोजी प्राप्त होतील, असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला. सात संदिग्ध आणि मंगरूळपीरचा एक संभ्रमित असे एकूण ८ जणांचे अहवाल काय येतात, याकडे आरोग्य यंत्रणेसह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिमMangrulpirमंगरूळपीर