शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

वाशिम जिल्ह्यात ५९ नवीन अंगणवाड्या साकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 15:56 IST

वाशिम : जिल्ह्यात १०७६ अंगणवाड्या असून, आणखी ५९ अंगणवाडी केंद्रांना जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी  अधिकारी दीपक कुमार मीना यांनी प्रशासकीय मंजूरी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क    वाशिम : जिल्ह्यात १०७६ अंगणवाड्या असून, आणखी ५९ अंगणवाडी केंद्रांना जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी  अधिकारी दीपक कुमार मीना यांनी प्रशासकीय मंजूरी दिली आहे. जिल्हा नियोजन विभागाकडून निधी प्राप्त होताच, या अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम सुरू करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून केली जाते. लोकसंख्येच्या निकषानुसार आणखी काही अंगणवाडी केंद्रांची गरज असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्याअनुषंगाने नवीन अंगणवाडी केंद्रांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सन २०१८-१९ या वर्षात २० आणि सन २०१९-२० या वर्षात ३९ अशा एकूण ५९ अंगणवाडी केंद्रांना मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी प्रशासकीय मंजूरी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अंगणवाडी केंद्रांना, शासनाच्या श्वेतपत्रिकेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या रकमेच्या दीडपट मर्यादेमध्ये प्रशासकीय मंजूरीदेखील प्रदान करण्यात आली आहे.सन २०१८-१९ या वर्षात मारसूळ, खंडाळा शिंदे, करंजी क्र. २, अंचळ, पार्डी तिखे, घोटा, चिंचाबा भर क्र.१, मूर्तिजापूर, पेडगाव क्र. ४, माळशेलु क्र.२, लखमापूर, म्हसणी क्र. २, दापुरा बु. क्र.२, गोस्ता क्र.२, खेर्डा खु. मिनी, तोरनाळा क्र.२, जांभरून भी., काटा क्र.३, वाघोली खु., कन्हेरी अशा २० नवीन अंगणवाडी केंद्रांना जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रत्येक अंगणवाडी केंद्राच्या बांधकामासाठी ८.५० लाख रुपये निधी कामासदेखील प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.तसेच सन २०१९-२० या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून ३९ नवीन अंगणवाडी केंद्रांना, शासनाच्या श्वेतपत्रिकेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या २.२५ कोटी तरतुदीच्या दीडपट मर्यादेमध्ये प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये पिंपळा, सोनाळा क्र.१, आमखेडा मिनी, मोप क्र.२, शेलु खडसे, मोहजा बंदी, भर जहॉगीर क्र.४, लोणी बु. क्र.१, कोयाळी बु., पिंपरखेडा, वाडी वाकद, कंकरवाडी क्र.२, येवती क्र.१, जवळा, कुºहा, वाकद क्र ६, वडजी, शेलगाव राजगुरे, नावली क्र १, येवती क्र २, कुकसा, कळमगव्हाण, नंधाना क्र १, वरूड तोफा, किनखेडा, हिवरापेन, मुंगसाजी नगर, सवड क्र.३, आसोला खु. क्र.१, दापुरा खुर्द, जगदंबानगर, जनुना, उज्वलनगर, वटफळ क्र.२, फुलउमरी क्र.१, पूर, केकतउमरा, किनखेडा ता. वाशिम, कामठवाडा अशा ३९ अंंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे. 

टॅग्स :washimवाशिम