मानोरा (जि. वाशिम): तालुक्यातील चौसाळा येथील आरोपी मोरेश्वर विनायक पुंड याने एका १७ वर्षीय कुमारिकेवर बलात्कार केल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी मानोरा पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ५0६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. मानोरा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या मौजे चौसाळा येथील एका १७ वर्षीय कुमारिकेवर आरोपी मोरेश्वर पुंड याने १५ सप्टेंबर रोजी ११ वाजताच्या दरम्यान बलात्कार केला. याची वाच्यता न करण्याची धमकीही आरोपीने दिली. पीडित कुमारिकेने दिलेल्या तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ५0६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. घटनेचा पुढील त पास पोलीस करीत आहेत.
१७ वर्षीय मुलीवर बलात्कार
By admin | Updated: October 17, 2015 01:54 IST