शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगेवरील विद्युत उपकेंद्रांसाठी हवे १५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 12:12 IST

Washim News किमान १५ कोटींचा निधी लागणार असून शासनस्तरावरून तो मिळणे अशक्य झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे१२ विद्युत उपकेंद्र उभारण्यास शासनाने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला. नोव्हेंबर २०२० अखेर त्यातील १० उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली.दोन विद्युत उपकेंद्रांसाठी १५ कोटींचा निधी मिळाला नसल्याने ही कामे प्रलंबित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले. हे काम २०१७ मध्ये पूर्ण झाले; मात्र १२ पैकी १० विद्यूत उपकेंद्रांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. याशिवाय हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे असलेल्या १३२ के.व्ही. पॉवरहाऊस येथून विद्युत प्रवाह घेण्यासाठी लाईन टाकण्याचा प्रश्नही रखडला आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी किमान १५ कोटींचा निधी लागणार असून शासनस्तरावरून तो मिळणे अशक्य झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम-हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीचे पाणी सिंचनासाठी वापरता यावे, पावसाचे पाणी नदीपात्रातून वाहून जाण्याऐवजी ते ठिकठिकाणी अडविता यावे, यासाठी ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून आडगाव, कोकलगाव, गणेशपूर, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली, राजगाव, वरूड, जुमडा, जयपूर आणि उकळी या ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले आहेत. त्यात परतीच्या पावसाचे पाणी अडविणे शक्य झाले आहे. दरम्यान, मोटारपंपाने नदीपात्रातील पाणी घेण्याकरिता विद्युतची गरज भासणार आहे. त्यासाठी १२ विद्युत उपकेंद्र उभारण्यास शासनाने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला. नोव्हेंबर २०२० अखेर त्यातील १० उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली; परंतु राजगाव आणि आटकळी येथील दोन विद्युत उपकेंद्रांसाठी व हिंगोली येथून मुख्य विद्युत प्रवाह खेचण्याकरिता लागणारा १५ कोटींचा निधी मिळाला नसल्याने ही कामे प्रलंबित आहेत. परिणामी, गणेशपूर, अटकळी, राजगाव अशा काही उपकेंद्रांची कामे रखडली असून, नदीपात्रातील पाण्याचा अपेक्षित फायदा अद्याप झालेला नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

प्रलंबित असलेल्या उपकेंद्रांची कामे पूर्ण करण्यासाठी तसेच सेनगाव (जि. हिंगोली) येथील १३२ के.व्ही. पॉवर हाऊसमधून मुख्य लाईन टाकण्याचे काम १७ किलो मिटरपर्यंत पूर्ण झाले आहे. तर १५ किलोमिटरचे काम अपूर्ण आहे. यासाठी लागणाऱ्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. निधी मंजूर होताच अन्य उपकेंद्रांप्रमाणे प्रलंबित असलेली कामेही पूर्ण केली जातील. तसेच मुख्य विद्युत वाहिणी टाकण्याचे कामही विनाविलंब पूर्ण केले जाईल.- आर.जी. तायडे,  कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण