शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी १५ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 14:02 IST

शिरपूर जैन: तीर्थक्षेत्र क गटात समाविष्ट असलेल्या शिरपूर जैन येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत १५ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून गावात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. 

ठळक मुद्देविविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन येथे सुरूच असते आणि यानिमित्त वर्षाकाठी ५ लाखांवर भाविकांचे येथून आवागमन सुरू असते. भाविकांची संख्या लक्षात घेता. विविध सोयीसुविधा आणि सुसज्ज, प्रशस्त रस्ते येथे आवश्यक आहेत. आता या तीर्थक्षेत्राच्या १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

शिरपूर जैन: तीर्थक्षेत्र क गटात समाविष्ट असलेल्या शिरपूर जैन येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत १५ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून गावात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. जैन बांधवांची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया शिरपूर जैन येथे जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थान, जानगीर महाराज संस्थान, हजरत मिर्झा मियॉ दर्गाह, विश्वकर्मा मंदीर, खंडोबा व लकडोबा, तसेच नागनाथ, अशी विविध मंदिरे आहेत. त्यामुळे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन येथे सुरूच असते आणि यानिमित्त वर्षाकाठी ५ लाखांवर भाविकांचे येथून आवागमन सुरू असते. येथे येणाºया भाविकांची संख्या लक्षात घेता. विविध सोयीसुविधा आणि सुसज्ज, प्रशस्त रस्ते येथे आवश्यक आहेत; परंतु स्थिती अगदी त्या विपरित असून, रस्ते अरुंद आणि उबडखाबड आहेत. नाल्यांचे सांडपाणी वाहून जाण्याची नीट व्यवस्था नाही. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा विकास करणे आवश्यक होते.  या तीर्थक्षेत्राच्या विकासाचा आराखडाही पूर्वीच तयार करण्यात आला; परंतु या आराखड्यानुसार विकास कामे करण्यासाठी अपेक्षीत निधी मिळत नव्हता. त्यामुळे  माजी आमदार दिवंगत सुभाष झनक, विद्यमान आमदार सुभाष झनक, तसेच माजी सभापती डॉ. शाम गाभणे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांना यशही आले आणि आता या तीर्थक्षेत्राच्या १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून गावातील मुख्य रस्त्यांसह लहान रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन