शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

१४ व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:30 IST

तडकाफडकी दखल घेऊन हा निधी सर्व ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करण्यात आला.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १४ व्या वित्त आयोगांतर्गंत जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींसाठी नोव्हेंबर २०१९ मध्ये मिळालेला ३२.७२ कोटींच्या निधी वितरणात जिल्हा परिषदेने प्रचंड दिरंगाई केली. यासंदर्भात ‘लोकमत’ने ६ फेब्रूवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून सदर प्रकरण उजेडात आणले. त्याची तडकाफडकी दखल घेऊन हा निधी सर्व ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करण्यात आला.नोव्हेंबर २०१९ मध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या ‘जनरल बेसीक ग्रँट’च्या दुसऱ्या हप्त्यापोटी ३२ कोटी ७२ लाख ३ हजारांचा निधी देण्यात आला. तो आधुनिक बँकींग सिस्टीमव्दारे संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर ५ ते १० दिवसांत वर्ग करावा. विलंब झाल्यास भारतीय रिझर्व बँकेने निर्धारित केलेल्या दराने ग्रामपंचायतींना व्याज देणे जिल्हा परिषदेस बंधनकारक राहील, अशा स्पष्ट सूचना शासनाने दिल्या होत्या; मात्र तीन महिने उलटूनही जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीच्या बँक खात्यामध्ये जिल्हा परिषदेकडून निधी वितरित झाला नव्हता. पंचायत विभागाने याकामी उदासिनता बाळगल्याने तथा निधी मिळण्यास विलंब होत असल्याने ग्रामीण भागातील विकासकामे खोळंबली.दरम्यान, या विषयावर ‘लोकमत’ने ६ फेबू्रवारीच्या अंकात ‘३२.७२ कोटी रुपयांच्या निधी वितरणात जि.प.ची दिरंगाई’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीची पाऊले उचलत दुसºयाच दिवशी निधीचा धनादेश स्टेट बँकेत जमा केला. तेथून ग्रामपंचायतींचे खाते असलेल्या सेंट्रल बँक आॅफ इंडियामध्ये निधी जमा झाला असून हा प्रश्न निकाली निघाला.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत