शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वीज सुविधांच्या ९२ कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 14:31 IST

वाशिम जिल्ह्यात उभारले जाणार १४ वीज उपकेंद्र 

वाशिम : पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या पैनगंगा बॅरेजेस परिसरात सिंचनासाठी लागणाऱ्या विजेच्या भौतिक सुविधा उभारण्यासह १४ ठिकाणी विद्यूत उपकेंद्र उभारले जाणार आहेत. ९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर असलेल्या या कामांची निविदा प्रक्रिया महावितरणच्या मुख्य कार्यालयाकडून राबविण्यात येत असून ती सध्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांनी गुरुवारी दिली.

वाशिम जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील बॅरेजेसमुळे जिल्ह्यातील आडगाव, कोकलगाव, गणेशपूर, सोनगव्हाण, टणका, ढिल्ली, राजगाव, वरूड, जुमडा, जयपूर आणि उकळी या ११ गाव परिसरांसह जिल्ह्यातील  ५ हजार ५५४ हेक्टर व नजिकच्या हिंगोली जिल्ह्यातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.  मात्र, बॅरेजेस परिसरात विजेची सुविधा नसल्याने उपलब्ध पाणी सिंचनासाठी वापरता येणे अशक्य झाले होते. याप्रकरणी 'लोकमत'ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून सलग पाठपुरावा केला. याशिवाय आमदार राजेंद्र पाटणी यांनीही शासन दरबारी प्रयत्न केल्याने अखेर बॅरेजेस परिसरात वीज सुविधा उभारण्यासाठी जलसंपदा विभागाने अपेक्षित ९२ कोटी रुपयांपैकी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सदर रकमेचा धनादेश ५ एप्रिल २०१८ रोजी महावितरणकडे सुपूर्द केला. वीज सुविधा उभारण्याकरिता आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रत्यक्ष कामे सुरू होतील अशी माहिती प्राप्त झाली. 

बॅरेजेस परिसरात वीज सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून २५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यानुषंगाने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्ह्यातील वीज सुविधांसंदर्भातील प्रत्यक्ष कामे लवकरच सुरू होतील.

- व्ही.बी. बेथारिया, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम

टॅग्स :electricityवीज