शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषदेचे १४, पंचायत समितीच्या १९ सदस्यांची पदे रिक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 11:13 IST

Washim Zilla Parishad News जिल्हा परिषदेचे १४ आणि पंचायत समितीच्या १९ सदस्यांची पदे रिक्त झाली आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी प्रवर्गातील सदस्यांच्या सर्व जागा, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ४ मार्चपासून रिक्त झाल्याचा आदेश निवडणूक विभागाने संबंधित सदस्यांना सोमवारी बजावला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ आणि पंचायत समितीच्या १९ सदस्यांची पदे रिक्त झाली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना, न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून जानेवारी २०२० मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक घेण्यात आली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च राेजी आरक्षणासंदर्भातील याचिका निकाली काढत, ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्यामुळे  संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून दोन आठवड्यांत पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या या निकालानुसार, राज्य निवडणूक आयोगाने पुढील कार्यवाही सुरू करत, ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रिक्त झाल्यासंदर्भात संबंधित सदस्यांना ९ मार्चपर्यंत आदेश बजाविण्यात यावा  आणि तसा अहवाल १० मार्चपर्यंत सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. यानुसार वाशिम जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गातील १४ आणि रिसोड, वाशिम, मंगरूळपीर व मालेगाव पंचायत समितीच्या ओबीसी प्रवर्गातील १९ सदस्यांना पद रिक्त झाल्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली. ओबीसी प्रवर्गातील संबंधित सदस्यांना नोटीस बजावल्यानंतर यासंदर्भातील अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे विहीत कालावधीपूर्वी सादर केला जाईल, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर यांनी सांगितले. पदे रिक्त होण्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जि.प. अर्थ व बांधकाम सभापती विजय खानझोडे, महिला व बालकल्याण सभापती शोभा गावंडे, रिसोड पंचायत समितीच्या सभापती गीता हरिमकर या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पदे रिक्त झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती वर्तुळासह राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आहे. 

निवडणूक कार्यक्रमाकडे लागले लक्षसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी प्रवर्गातील सदस्यांचे पद रिक्त झाल्याची नोटीस बजावण्यात आली. दोन आठवड्यांत निवडणूक घेण्याचेही आदेशात नमूद आहे. त्यानुसार दोन आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम घोषित होणार की या प्रकरणाला आणखी काही वेगळं वळण लागणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

ओबीसी प्रवर्गातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सर्व जागा रिक्त झाल्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे पत्र जिल्हा प्रशासनाला  प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली. संबंधित सदस्यांना नोटीस बजावल्या असून, राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविला जाईल. - सुनील विंचनकरउपजिल्हाधिकारी (महसूल)

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद