शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१४ तासांच्या वीज भारनियमनाचा ‘डिजिटल’ शाळांनाही फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:27 IST

ग्रामीण भागात सलग १४ तासांचे वीज भारनियमन केले जात असल्याने अन्य घटकांसोबतच त्याचा मोठा फटका ‘डिजिटल’ शाळांनाही बसत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के विद्यार्थी प्रगत करण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून २५० आणि शासकीय निधीतून २३४ अशा एकूण ४८४ शाळा ‘डिजिटल’ झाल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात सलग १४ तासांचे वीज भारनियमन केले जात असल्याने अन्य घटकांसोबतच त्याचा मोठा फटका ‘डिजिटल’ शाळांनाही बसत असल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ शाळा असून, नगर परिषद, नवोदय आणि अन्य शासकीय अशा ५७ शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून विद्यार्थी प्रगत करण्यासाठी शिक्षकांच्या सहकार्यातून प्रयत्न सुरू आहेत. त्यानुषंगाने लोकसहभागातून शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. त्याचे चांगले परिणाम झाले असून २५० शाळा लोकवर्गणीतून डिजिटल झाल्या आहेत. यामाध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांच्यात तंत्रज्ञान वापरण्याची आणि विज्ञानाच्या प्रयोगाची माहिती सुलभ व सुकर करून देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, दिवसागणिक वाढत्या वीज भारनियमनामुळे ग्रामीण भागातील शाळांचा विद्यूत पुरवठा तासन्तास खंडित राहत असल्याने डिजिटल वर्गखोल्या निव्वळ शोभेच्या वास्तू बनल्या आहेत. त्याचा कुठलाच फायदा विद्यार्थ्यांना मिळत नसल्याची ओरड पालकांमधून होत आहे. ही बाब लक्षात घेता किमान शाळांना तरी सलग वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाmahavitaranमहावितरण