शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींना मिळाले नवे कारभारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 12:31 IST

Gram Panchayat Election तिसऱ्या टप्प्यात १७ फेब्रुवारी रोजी १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.

वाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक संपल्यानंतर, तिसऱ्या टप्प्यात १७ फेब्रुवारी रोजी १४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. १४ ग्रामपंचायतींना नवे कारभारी मिळाले आहेत.जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या दरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान निवडणूक झाली. सरपंच, उपसरपंच पदांसाठी १५ ते १७ फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांत निवडणूक घेण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात १७ फेब्रुवारी रोजी मालेगाव तालुक्यातील १० आणि मानोरा तालुक्यातील चार अशा एकूण १४ ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच पदांसाठी निवडणूक झाली.मालेगाव : : तालुक्यातील १० ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचांची निवड आज करण्यात आली. जऊळका सरपंचपदी सुवर्णा रमेश लांडगे, उपसरपंचपदी गजानन सखाराम तोडकर, खिडा येथे सरपंचपदी रेखा दत्ता लठड, उपसरपंच विद्या शेषराव शिंदे, मुंगळामध्ये सरपंच शुभांगी प्रवीण वायकर, उपसरपंच नंदकिशोर प्रभाकर वनस्कर, पांगरी कुटे सरपंचपद रिक्त ठेवण्यात आले असून उपसरपंचपदी भाग्यश्री सतिष कुटे यांची निवड झाली. वसारी येथील सरपंचपदही रिक्त आहे; तर उपसरपंचपदी लक्ष्मण हरिभाऊ जाधव यांची निवड झाली. तिवळी सरपंचपदी गजानन बन्सी इंगळे, उपसरपंच मालती भानुदास बकाल, जोडगव्हाण सरपंचपदी रणजीत एकनाथ जाधव, उपसरपंचपदी सुमित्रा संदीप कांबळे, राजुरा सरपंच पद रिक्त, उपसरपंचपदी यशोदा लक्ष्मण लावणे, शिरसाळा सरपंच पद रिक्त, उपसरपंचपदी रामकोर आत्माराम इंगोले आणि वाकळवाडी सरपंचपदी जिजा श्रीकृष्ण चापे; तर उपसरपंचपदी विजया राजू व्यवहारे यांची निवड झाली.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच