शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात जलसंधारणाची १३८ कामे पुर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 16:45 IST

एकुण १३८ कामे पुर्ण झाली असून ४१  कामे प्रगतीपथावर असल्याची माहीती सुजलाम सुफलम अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सांमजस्य करारानुसार सुजलाम सुफलाम दुष्काळ मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत वाशिम जिल्हयातील कारंजा, मानोरा, रिसोड, मालेगाव, रिसोड, वाशिम या सहाही तालुक्यात नाला खोलकरण, सिएनबी खोलकरण, शेततळे, सिसिटी, डिपसिसिटी, शेताची बांध बदिस्ती, माती नाला बांध, गाव तलाव खोलीकरणाचे असे  एकुण १३८ कामे पुर्ण झाली असून ४१  कामे प्रगतीपथावर असल्याची माहीती सुजलाम सुफलम अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी दिली. सुजलाम सुफलाम अभियानाची कामे वाशिम जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा कृषी अधिक्षक दत्तात्रय गावसाने व जिल्हयातील जलसंपदा विभाग, कृषी विभाग, वन विभाग, लघु पाटबंधारे जि.प.विभाग, मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या सहकार्यने जलसंधारणाची कामे पुर्ण होत आहे. या कामाकरीता भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेच्या तसेच ज्या गावात जलसंधारणची कामे सुरू आहेत त्या गावक-यांचे सहकार्य मिळत आहे.  वाशिम जिल्हयात सहाही तालुक्यात जलसंधारणाची कामे झाली त्यामध्ये वाशिम तालुक्यात ४६ कामे पुर्ण तर १० कामे सुरू आहेत. तर मानोरा तालुक्यात १५ पुर्ण तर ५ कामे सुरू तर मंगरूळपीर तालुक्यात ८ पुर्ण तर ९ कामे सुरू तर मालेगाव तालुक्यात २० कामे पुर्ण तर ६ कामे सुरू तर कारंजा तालुक्यात २१ कामे पुर्ण तर ७ कामे सुरू तर रिसोड १३  पुर्ण असून ४ सुरू आहेत. जिल्हयात ट्रक्चरनिहाय झालेली नालाखोलीकरण ६६ सिएनबी नाला खोेलीकरण ३५, शेततळे १३ सिसिटी ५,डिप सिसिटी १७, शेताची बांध बदिस्ती २७, माती नाला बांध २, गाव तलावातील गाळ काढणे १४ ही कामे झालेली असून पाउस येईपर्यंत जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात होणार असल्याची माहीती सुजलाम सुफलाम अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी दिली.   (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा