शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 13:51 IST

वाशिम : देशातील गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील १.३६ लाख कुटुंबाला मिळणार आहे.

ठळक मुद्देवाकाटक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात योजनेच्या लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले.आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात उपस्थितांनी बघितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशातील गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ जिल्ह्यातील १.३६ लाख कुटुंबाला मिळणार आहे. या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ सप्टेंबर रोजी झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात योजनेच्या लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले. झारखंडची राजधानी रांची येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात उपस्थितांनी बघितले.यावेळी जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, आरोग्य सेवा (कुष्ठरोग)चे सहाय्यक संचालक डॉ. दीपक सेलोकार, डॉ. हेडाऊ उस्पस्थित होते.आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ लक्ष १६ हजार व शहरी भागातील १९ हजार असे एकूण १ लक्ष ३५ हजार कुटुंबांचा समावेश आहे. या कुटूंबांना प्रतिवर्षी ५ लक्ष रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवांचा लाभ मोफत मिळणार आहे. यामध्ये १ हजार पेक्षा अधिक विविध औषधोपचार व शस्त्रक्रियांचा समावेश आहे. सन २०११ मधील सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेनुसार ग्रामीण भागातील घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावती व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी ७ वर्गातील कुटुंबांचा तसेच शहरी भागातील कचरावेचक, भिकारी, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, कारागीर इत्यादी ११ वर्गातील कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य