शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथील ‘मॉडेल डिग्री’ कॉलेजच्या बांधकामासाठी १२ कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 15:21 IST

वाशिम : आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ठ असलेल्या वाशिम जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज मंजूर झालेले आहे.

वाशिम : आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत समाविष्ठ असलेल्या वाशिम जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज मंजूर झालेले आहे. पाच एकरात उभारल्या जाणाऱ्या ‘मॉडेल डिग्री’ कॉलेजच्या बांधकामासाठी १२ कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकास शासनाची मंजूरी मिळालेली आहे. सदर बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाणार आहे.निती आयोगाने देशभरात ७० आकांक्षित (अ‍ॅस्पीरेशन) जिल्ह्यांची निवड केली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील स्थूल नोंदणी प्रमाण (विद्यार्थ्यांचीे शाळा, महाविद्यालयातील नोंदणी), मुलींची संख्या व मागासवर्गीयांच्या लोकसंख्येचे प्रमाण या निकषावर त्या जिल्ह्यात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून मानव संसाधन विकास, मंत्रालयाच्या प्रकल्प मंजूरी मंडळाच्या १२ व्या बैठकीत राज्यातील नंदूरबार व वाशिम या दोन जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज स्थापन करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील चिखली ता. मंगरूळपीर येथे पाच एकर परिसरात शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजची उभारणी होणार असून, इमारत बांधकामाच्या १२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ७ डिसेंबर रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. सदर कॉलेज हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाशी संलग्नीत राहणार असून, प्रशासकीय नियंत्रण हे शासनाचे राहणार आहे. इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्याने जिल्हावासियांच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत.

शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज हे चिखली ता. मंगरूळपीर येथे पाच एकर क्षेत्रात उभारले जाणार आहे. सदर जमिन उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नावेही करण्यात आलेली आहे. आता इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आहे.- शैलेश हिंगे,निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcollegeमहाविद्यालय