शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम शहरातील ११९ रुग्णालयांकडे अग्निशमनची 'एनओसी'च नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 11:59 IST

Washim Hospital शहरातील काही माेजक्या ४ ते ५ हाॅस्पिटलकडेच अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आहे.

ठळक मुद्दे अग्निशमन विभागाकडून प्रत्येक रुग्णालयाला दोन एनओसी घ्याव्या लागतात.केवळ पाच रुग्णालयांनी अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणापत्र घेतलेले आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांचा ‘फायर ऑडिट’चा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयाचे काम सुरू करण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर अशा अग्निशमन विभागाकडून प्रत्येक रुग्णालयाला दोन एनओसी घ्याव्या लागतात.  वाशिम शहरातील किती रुग्णालयाने हे नाहरकत प्रमाणपत्र घेतले याची माहिती घेतली असता ११९ रुग्णांलयांकडे ते नसल्याची माहिती पुढे आली आहे.वाशिम शहरामध्ये एकूण १२४ नाेंदणीकृत रुग्णालये आहेत. यापैकी केवळ ५७ रुग्णालयांची फायर ब्रिगेड नाेंदणी करण्यात आली आहे. परंतु यातील केवळ पाच रुग्णालयांनी अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणापत्र घेतलेले आहे.  वाशिम शहरातील असलेल्या बहुतांश रुग्णालयांतील फायर ऑडिट करण्यात आले असले तरी अग्निशनम विभागाचे प्रमाणपत्र मात्र माेजक्याच हाॅस्पिटलकडे असल्याचे अग्निशमन विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. फायर ऑडिट केल्यानंतर अग्निमशन विभागाकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करून ते घ्यावे लागते. मात्र, अनेकांनी हे प्रमाणपत्र घेतले नसल्याचे अग्निशमन विभागातील नाेंदीवरून दिसून येते. शहरातील काही नामांकित व माेठ्या अशा केवळ ५ हाॅस्पिटलकडेच नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध असल्याची माहिती आहे.

शहरातील काही माेजक्या ४ ते ५ हाॅस्पिटलकडेच अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आहे. १० जानेवारी राेजी शहरातील ७३ हाॅस्पिटलला भेट देऊन सर्वांना याबाबत नाेटीस बजावण्यात आली आहे. यामधील अनेक हाॅस्पिटलचे फायर ऑडिट झाल्याचे दिसून आले. - अनुजकुमार बासम, अग्निशमन विभागप्रमुख, वाशिम

टॅग्स :washimवाशिमfireआगhospitalहॉस्पिटल