शिखरचंद बागरेचा / वाशिम: ग्रामीण भागातील गरोदर माताना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, यासाठी राबविण्यात येत असलेल्या जननी शिशू सुरक्षा योजनेचा सन २0१४-१५ या वर्षात सुमारे ११७३ महिला लाभार्थींनी लाभ घेतला, तर ५७५ आशा सेवकांनी सुद्धा या योजनेत सेवा देऊन लाभ घेतला. गरोदर माताना बाळतपणासाठी तसेच गंभीर आजारी असलेल्या बाळाला रुग्णवाहीकेने रुग्णालयात आणण्यासाठी जननी शिशु सुरक्षा योजना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमाने राज्यशासन राबवित आहे . सदर योजनेअंतर्गत प्रसूती झाल्यानंतर माता व बालकाला घरी पोहचविणे तसेच रक्तपुरवठा उपचार तपासण्या, आहार आदी सेवा पूर्णपणे मोफत देण्यात येते दारिद्य्ररेषेखालील तसेच अनूसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असलेल्या गरोदर मातांना गरोदरपणात तसेच प्रसूतीनंतर ४२ दिवसापर्यंत मोफत औषधे व उपचार अशी सेवा देण्यात येते लाभार्थ्याच्या घरापासून प्राथमिक आरोग्यकडे व शासकीय रुग्णालयापर्यंत तसेच परतीसाठी वाहनाची मोफत सेवा जननी शिशू सुरक्षा योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. आरोग्य संस्थेचा दर्जा व उपलब्ध सुविधानुसार रक्त ,लघवी व सोनोग्राफी सारख्या तपासण्या तसेच रक्तपुरवठा सुद्धा मोफत करण्यात येतो. या शिवाय सामान्य बाळातपण झाल्यास तीन दिवस तर शस्त्रक्रियेद्वारे बाळंतपण झाल्यास सात दिवसापर्यंत मातेला मोफत औषधी व आहार देखील दिला जातो. प्रसूतीनंतर जन्मलेल्या बाळाला ३0 दिवसापर्यंत आजारपणात मोफत औषधोपचार केला जातो. सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ११७३ गरोदर मातांनी एकूण ८ लाख २७ हजार ९00 रुपयाचा लाभ घेतला तर गरोदर माताना गरोदरपणापासून प्रसूतीपर्यंत सेवा देणार्या ५७५ आशा सेविकांनी २ लाख ४१ हजार २00 रुपयाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील एकूण ६५ गरोदर मातांच्या सिझर म्हणजे शस्त्रक्रियद्वारे यशस्वी बाळांतपण सुद्धा करण्यात आले आहे.
११७३ गरोदर मातांनी घेतला लाभ
By admin | Updated: March 13, 2015 01:53 IST