शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

२.०३ लाख बाधितांना मिळणार वाढीव दराने ११५.२६ कोटी

By दिनेश पठाडे | Updated: January 16, 2024 18:06 IST

अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

वाशिम: शासनाने नैसर्गिक आपत्तीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीत मोठी वाढ केली आहे.  जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८५७ शेतकऱ्यांना ११५ कोटी २६ लाख ६२ हजार ४१३ कोटींची मदत मिळणार आहे. जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मिळणाऱ्या मदतीचा लाभ होणार आहे.

नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी राज्य आपती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टर ऐवजी मर्यादा तीन हेक्टर मर्यादेत मदत मिळणार आहे. त्यात जिरायत पिकांच्या नुकसानासाठी १३,६००, बागायती पिकांच्या नुकसानासाठी २७,०० आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६,००० प्रतिहेक्टर या दराने भरपाई मिळेल.  नोव्हेंबर २०२३ मधील पीक नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्वीच्या प्रचलित दरानुसार ७६ कोटी ३७ लाख ९८ हजार ४५८ रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यामध्ये जिरायत पिकांच्या नुकसानासाठी पूर्वीच्या प्रचलित दरानुसार ३३ कोटी २१ लाख ९४ हजार ८४८ रुपये, तर बागायती पिकांच्या नुकसानासाठी ४३ कोटी १६ लाख ३ हजार ६१० रुपये निधीचा समावेश होता. आता बागायती पीक नुकसानभरपाई म्हणून ५४ हजार ५९२ शेतकऱ्यांना ६७ कोटी १० लाख ४८ हजार ५५० तर जिरायती पीक नुकसानभरपाईसाठी १ लाख ४९ हजार २६५ शेतकऱ्यांना ४८ कोटी १६ लाख १३ हजार ८६३ रुपयांची मदत मिळणार आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी