शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : ९६ अंगणवाडींसाठी १.१० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:37 IST

जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, यामध्ये ८८ हजार ६८८ बालक पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयातील ९६ अंगणवाडी केंद्राच्या दुरूस्तीसाठी १.१० कोटी रुपयांच्या कामांना जिल्हा परिषद प्रशासनाने ६ मार्च रोजी प्रशासकीय मंजूरी दिली आहे. सदर निधी पंचायत समितीकडे वितरीत करण्याचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून, यामध्ये ८८ हजार ६८८ बालक पूर्वप्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून बालकांना शिक्षण देताना मुलभूत सुविधा उपलब्ध असणेही आवश्यक आहे. जिल्ह्यातील ९६ अंगणवाडी केंद्राच्या इमारतींची अवस्था अत्यंत खराब झाल्यामुळे सदरहू इमारतीची दुरुस्ती करणे अत्यावश्यक झाले होते. ग्राम पंचायत स्तरावरून सदर अंगणवाडी केंद्राच्या दुरूस्तीची मागणी समोर आली होती. ९६ अंगणवाडी केंद्राच्या दुरूस्तीसाठी विशेष तरतुदीद्वारे निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला व बालकल्याण सभापती शोभा सुरेश गावंडे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. याला यश आले असून, १.१० कोटींचा निधी मिळाला आहे. सदर नादुरुस्त इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी मिळालेल्या १ कोटी दहा लक्ष रुपयांच्या प्रशासकीय कामांना ६ मार्च रोजी मंजुरी प्रदान केली आहे.सदरहू निधी वितरणाचे आदेशसुध्दा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी पंचायत समितीला वितरीत केले आहेत. सदर निधी मंजुरी व वितरणासाठी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड यांनी प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली.१.१० कोटींच्या निधी वितरणामुळे जिल्हयातील नादुरुस्त असलेल्या एकुण ९६ अंगणवाडी केंद्रांच्या इमारतीची दुरुस्ती होणार आहे. मुलभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र