शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हयात ११ हजार नोंदणीकृत कामगार बांधकाम ‘किट’पासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 16:48 IST

हजारो कामगारांनी वर्षभरापूर्वी नोंदणी करूनही त्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीची बांधकामासाठी उपयुक्त, आवश्यक असलेल्या अवजारांची किट वितरीत करण्यात येते किंवा तेवढे अर्थसहाय्य खात्यावर वर्ग केले जाते. वाशिम जिल्हयात मात्र कामगार कार्यालयांतर्गत हा लाभ देण्यासाठी अर्जांची छाननी प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरु असून, हजारो कामगारांनी वर्षभरापूर्वी नोंदणी करूनही त्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळालेला नाही.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने वाशिम जिल्ह्यात यासाठी १५ जून ते १४ आॅगस्टपर्यंत २१ प्रकारच्या बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष अभियानही राबविण्यात आले. या अंतर्गत हजारो कामगारांची नोंदणी करण्यात आली. आजवर वाशिम जिल्ह्यात १७ हजार १७८ कामगारांची नोंदणी करण्यात आली असली तरी, केवळ ५४९८ कामगारांना १,३६,२३, ९०० रुपयांचा विविध योजनांतर्गत लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे अद्यापही ११ हजार ६८० कामगारांना या मंडळाच्या विविध योजनांचा किंवा किटचा लाभ मिळालेला नाही. बांधकाम कामगारांना उपयुक्त, आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या १४ अवजारांची किट वितरीत करण्यात येते. या किटचे वितरण करण्याचे कंत्राट देण्यात आले असून, कामगार कार्यालयाकडून अर्जाची पडताळणी झाल्यानंतर कामगाराला कंत्राटदाराकडे पाठविण्यात येते. कंत्राटदाराकडून कामगारांचा आधार क्रमांक आणि बोटाचे ठसे घेऊन किटचे वितरण केले जाते. तथापि, यासाठी नोंदणी केलेल्या कामगारांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण करणे आवश्यक असून, ही प्रक्रिया वाशिम येथे संथगतीने सुरु आहे.

सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून नोंदणीकृत कामगारांच्या अर्जांची पडताळणी करूनच त्यांना पात्र, अपात्र ठरविले जाते. शासकीय योजनेचा लाभ बोगस लाभार्थींना मिळू नये म्हणून अर्जांची काटेकोर छानणी केली जाते. कर्मचारी कमी असल्याने त्यास विलंब लागत आहे. पात्र लाभार्थींना लाभ दिला जाणार आहे. नोंदणीसाठी केवळ ८५ रुपये शुल्क आकारले जात आहे.- गौरव नालिंदेसरकारी कामगार अधिकारी

टॅग्स :washimवाशिमLabourकामगार