शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘फिट इंडिया फ्रिडम रन’ अंतर्गत धावले ११ राष्ट्रीय खेळाडू     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 16:18 IST

राष्ट्रीय स्तरावर खेळणारे ११ आणि राज्यस्तरावर खेळणार ६ खेळाडू पहिल्याच दिवशी सहभागी झाले.

-  नंदलाल पवार  लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर (वाशिम): हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या औचित्यावर जिल्हा क्रीडा दिनाच्या औचित्यावर २९ आॅगस्ट ते २ आॅक्टोबरपर्यंत फिट इंडिया रन हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात आट्या पाट्या क्रीडा प्रकारातील दोन शिवछत्रतपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू मिळून राष्ट्रीय स्तरावर खेळणारे ११ आणि राज्यस्तरावर खेळणार ६ खेळाडू पहिल्याच दिवशी सहभागी झाले. या खेळाडंूनी २९ आॅगस्ट रोजीच रनिंग करून सहभाग नोंदविला. दरवर्षी राज्यात व देशात २९ आॅगस्ट  हा दिवस हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनानिमिा  राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो; परंतु यावर्षी  कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुभार्व असल्याने क्रीडा स्पर्धांवर मर्यादा आल्या आहेत. तथापि, कोणतीही व्यक्ती स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवून कोरोना संसर्गापासून स्वत:चा बचाव करू शकते आणि हे विविध क्रीडा प्रकार आणि योगामुळे शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊनच क्रीडा विभागाने फिट इंडिया मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीनेही ‘फिट इंडिया फ्रिडम रन’ हा एक नवीन उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जय गजानन महाराज क्रीडा मंडळाच्यावतीने रनिंग हा क्रीडा प्रकार करून मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार यांना अभिवादन केले. यात ११ राष्ट्रीय आणि ६ राज्यस्तरीय खेळाडूंनी सहभाग घेतला. त्यात दोन शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचाही समावेश होता. तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते, ही बाब लक्षात घेऊन, तसेच समाजातील इतर लोकांना या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने युवा व खेळ मंत्रालयाच्या ‘फिट इंडिया फ्रिडम रन’ या उपक्रमात    जय गजानन महाराज क्रीडा मंडळाचे सदस्य सहभागी होत असल्याची माहिती शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू सागर गुल्हाने याने दिली.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर