शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनच्या कालावधीत कापड बाजाराला १०० कोटींचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:37 IST

४ मे पासून कापड दुकाने उघडल्याने पहिल्याच दिवशी कापड खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

- शिखरचंद बागरेचालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्च ते ३ एप्रिल या दरम्यान कापड बाजार बंद राहिल्याने जिल्ह्यात जवळपास १०० कोटींचा फटका कापड व्यवसायाला बसल्याचा दावा व्यावसायिकांनी ४ मे रोजी केला. दरम्यान, ४ मे पासून कापड दुकाने उघडल्याने पहिल्याच दिवशी कापड खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २४ मार्चपासून लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. लॉकडाउनमुळे लग्नसराईचे अर्ध्याहून अधिक मुहूर्त हातचे निघून गेले आहेत. यंदा लग्नसराईचा हंगाम पुढच्या वर्षावर लोटला गेला आहे. या अनुषंगाने या हंगामातील मोठा मानला जाणारा लग्नाचा बस्ता खरेदी होणार नसल्याने जिल्ह्यातील रेडिमेड व कापड व्यवसायाला सुमारे १०० कोटींच्यावर फटका बसला असल्याचे कापड व रेडिमेड व्यावसायिकांनी सांगितले. कापड व्यावसायिकांनी लग्नसराईचा हंगाम लक्षात घेऊन फेब्रुवारी महिन्यातच विविध प्रकारच्या कापडांची खरेदी करून या लग्नसराईसाठी बाजारपेठ सज्ज केली होती. तथापि अचानकपणे आलेल्या कोरोना संकटामुळे सार्वजनिक व मोठ्या प्रमाणात होणारे लग्नसोहळे रद्द झाल्याने याची जबर किंमत कापड बाजाराला चुकवावी लागली. जवळपास १०० कोटींचा फटका बसल्याचे व्यावसायिक नंदकिशोर पाटील यांनी सांगितले.कापड खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी४ मे पासून कापड दुकाने सुरू करण्याला मुभा मिळाली. सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत कापड दुकाने सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी नागरिकांनी कापड खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केल्याचे वाशिम शहरात दिसून आले. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना ग्राहकांना देण्यात आल्या. कापड दुकानांसमोर फिजिकल डिस्टन्सिंगसाठी पांढरे वर्तुळ रंगविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने ४ मे रोजी दिले.

कर्जाची परतफेड करण्याची चिंताप्रत्येकाच्या दुकानांमध्ये कामावर कामगार असून त्यांना घरातूनच पगार द्यावा लागत आहे. दुसरीकडे लग्नसराईचा हंगाम निघून गेल्याने आता कापड बाजाराला झळाळीदेखील नाही. अशा बिकट परिस्थितीत कापड व्यवसाय अडकला आहे. वाशिम शहरात रेडीमेड गारमेंट्सचे आठ ते दहा मोठे शोरूम आहेत. रेडिमेडची २५ ते ३० दुकाने तर आहेराची जवळपास एवढीच दुकाने आहेत. कर्जाची परतफेड कशी करावी, याची चिंता व्यावसायिकांना लागली.

टॅग्स :washimवाशिमbusinessव्यवसाय