शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१० लाख नागरिकांना मोफत मिळणार आयुर्वेद औषधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 11:11 IST

१० लाख नागरिकांना केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या होमिओपॅथी व आयुर्वेद औषधीचे लवकरच मोफत वाटप केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागातही होत असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील १० लाख नागरिकांना केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या होमिओपॅथी व आयुर्वेद औषधीचे लवकरच मोफत वाटप केले जाणार आहे.अलिकडच्या काळात ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. भेरा, खेर्डा, तामशी, बोराळा हिस्से, शेमलाई, आसेगाव पेन, राजुरा, हिवरा रोहिला, वसंतनगर पोहरादेवी यासह अन्य ग्रामीण भागातही यापूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता सदर गावे कोरोनामुक्त झालेली आहेत. दरम्यान, कोरोनाचा धोका अजून संपलेला नसल्याने यापुढेही ग्रामीण भागात आरोग्य विभागातर्फे विशेष उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्रालय यांचे निर्णयानुसार कोरोना ससंर्ग टाळण्यासाठी तसेच या आजारात रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने काही औषधांच्या शिफारसी केल्या आहेत. त्यापैकी अर्सेनिक अल्बम ३० व संशमनी वटी हे होमिओपॅथी व आयुर्वेदीक औषध कोरोना आजारात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते, अशी शिफारस करण्यात आल्याने या औषधाचा ग्रामीण भागातील १० लाख नागरिकांना मोफत पुरवठा लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी १० दिवसांपूर्वीच निधीची तरतूदही करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात पुरेसा औषधी साठापावसाळ्याचे दिवस लक्षात घेता तसेच कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात सर्दी, खोकला, ताप, अतिसार यासह अन्य महत्वाचा औषधी साठा उपलब्ध करण्यात आला आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

आरोग्य मंत्रालयाच्या शिफारशीनंतरच औषधी वाटपाचा निर्णयरोगप्रतिकार शक्ती वाढविण्यात महत्वपूर्ण असलेल्या काही औषधांची शिफारस भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने केली आहे. त्यातीलच औषधीचे मोफत वाटप आरोग्य विभागातर्फे केले जाईल.

ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत असल्याने नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आयुर्वेद व होमिओपॅथी औषधी्नचे वाटप ग्रामीण भागातील १० लाख नागरिकांना केले जाणार आहे.- चक्रधर गोटे,आरोग्य सभापती, जि.प. वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याAyurvedic Home Remediesघरगुती उपाय