शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील १.३० लाख शेतकरी स्वत: नोंदविणार सातबारावर माहिती

By दादाराव गायकवाड | Updated: September 6, 2022 13:58 IST

राज्यात मागील वर्षापासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

वाशिम

राज्यात मागील वर्षापासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या ई-पीक पाहणीमध्ये पीक पेरणीची माहिती स्वत: शेतकऱ्याला मोबाईल ॲपव्दारे गाव नमुना सातबारामध्ये नोंदविण्यासाठी उपलब्ध करुन देण्याच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हयात एकूण ८०९ गावे असून ई-पीक पाहणीची विशेष मोहिम १३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १ लक्ष ३० हजार ९२२ शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदविण्याचे उदिष्ट आहे.

मागील वर्षी ई-पीक पाहणीसाठी मोबाईल ॲप्लीकेशन प्रथमच शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले. उशिरा जनजागृती होऊनही जिल्ह्यातील ५० टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकाची नोंद गाव नमुना सातबारावर ई-पीक पाहणी मोबाईल ॲपव्दारे नोंदविली आहे. या खरीप हंगामात ई-पीक पाहणी नोंदविण्याची मोहिम १ ऑगस्टपासून सुरु करण्यात आली आहे. या हंगामात १०० टक्के नोंदणी ई-पीक पाहणी ॲप्लीकेशनव्दारे करण्याचे शासनाचे निर्देश आहे. त्याअनुषंगाने ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लीकेशनची माहिती व जनजागृती सर्व शेतकऱ्यांना व्हावी व त्यांना स्वत: शेतातील पिकाची माहिती गाव नमुना सातबारामध्ये नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने १३ सप्टेंबर रोजी मोहिम स्वरुपात शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदणी पुर्ण करण्याचे उदिष्ट निश्चित केले आहे. या दिवशी सुक्ष्म नियोजन करुन ही मोहिम यशस्वी करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांवर सोपविण्यात आली आहे.

मोहिमेच्या यशस्वितेसाठी गावनिहाय नियोजनई-पीक पाहणीची विशेष मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक गावनिहाय नियोजन व जनजागृती करुन तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतीशिल शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, सीएससी केंद्र चालक, संग्राम केंद्र चालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, युवक मंडळाचे पदाधिकारी अशा स्वयंसेवकाची निवड करुन त्यांच्या सहाय्याने गावातील शेतकऱ्यांना पिक पेरा भरण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिम