शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड तालुक्यात जि.प. शिक्षण विभागाचा ‘पांगुळगाडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:50 IST

शेकडोपदे रिक्त, ताण वाढला; विद्यार्थ्यांना धड वाचताही येत नसल्याची तक्रार

- राहुल वाडेकरविक्रमगड : जि.प.च्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची १५० पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहात आहे. त्यामुळे एक अथवा दोन शिक्षकांना अनेक वर्गाना शिकवावे लागत आहे. शिवाय शासनाच्या योजना आणि इतर कामे करावी लागत असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जावर परिणाम झाला आहे.तालुक्यात जिल्हा परीषद शाळे अंतर्गत व इतर आश्रम शाळेत एकूण १६ हजार ६७२ विद्यार्थीशिक्षण घेत आहेत. असे असताना विक्रमगड पंचायत समिती याच्या शिक्षण विभागात एकूण ७९७ पदे मंजुर असुन त्या पैकी ६२९ पदे भरण्यात आली आहेत तर १६८ पदे रिक्त आहेत. या मध्ये विस्तार अधिकारी वर्ग - २ मधील ४ पदे मंजुर असुन ३ पदे रीक्त आहेत. विस्तार अधिकारी वर्ग - ३ मधील ३ पदे मंजुर असून २ पदे रिक्त आहेत. केंद्रप्रमुखाची १६ पदे मंजुर असुन २ पदे रिक्त आहेत. मुख्यध्यापकाची ३६ पदे मंजुर असून ११ पदे रिक्त आहेत. पदविधर शिक्षकाची १५० पदे मंजुर असून ७९ पदे रिक्त आहेत. तर सहशिक्षकाची ५८६ पदे मंजुर असून ७१ पदे रीक्त आहेत. अशी तालुक्यातील शिक्षण विभागा अंतर्गत ७९७ पदा पैकी १६८ पदे रीक्त आहेत.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत चौथी ते सातवीच्या अनेक विद्यार्थ्यांना गुणाकार, भागाकार व इंग्रजीत स्पेलिंगचे पाहिजे तसे ज्ञान मिळत नसल्याने त्याचा शैक्षणिक पाया कमकुवत असल्याचा आरोप पालकांन कडून होत आहे. आदिवासी तालुका असल्याने शासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे. फक्त शाळा दुरुस्तीवर ठेकेदाराच्या फायदयासाठी लाखो रुपये खर्च केला जात असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. पदवीधर शिक्षकाची ७९ तर सहशिक्षकाची ७१ अशी १५० पदे रिक्त आहेत. या परिस्थितीमुळे एक किंवा दोन शिक्षकांना दोन ते तीन वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. रिक्त पदांमुळे तालुक्यातील शैक्षणिक दर्जा ढासळत चालला आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेतून नाव काढून पालक खासगी शाळांना पसंती देत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात खासगी शाळांचा वरचष्मा आहे. त्याची फी परवडणारी नसतांनाही पालक आर्थिक अडचण सोसून ती विनातक्रार भरत आहेत.पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्या संदर्भात वरीष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यावहार केला आहे.- भगवान मोकाशी, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, विक्रमगडविक्र मगड तालुक्यात शिक्षणाची स्थिती भयावह आहे. रिक्त पदामुळे एका शिक्षकाला दोन ते तीन वर्ग सांभाळावे लागत आहेत. त्यातच तालुक्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही घसरली असून जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्या संदर्भात शासनाने उपाय योजना करायला हव्यात.- ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे,तालुका अध्यक्ष, विक्रमगड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीpalgharपालघर