शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळेत फक्त आदिवासी विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:38 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या दिवसागणिक कमी होत आहे. जे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्या मध्ये केवळ ८० ते ९० टक्के विद्यार्थी आदिवासी असतात. त्यामुळे या शाळा केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच उरल्या आहेत.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी  - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या दिवसागणिक कमी होत आहे. जे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्या मध्ये केवळ ८० ते ९० टक्के विद्यार्थी आदिवासी असतात. त्यामुळे या शाळा केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच उरल्या आहेत. या तालुक्यात २६ केंद्र असून जिल्हा परिषदेच्या ४६२ शाळा आहेत. त्या पैकी कमी पटसंख्येमुळे अनेक शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.शहारांप्रमाणेच खेडेगावातही कमी पटसंख्येमुळे जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद पडण्यास सुरु वात झाली आहे. ज्या सुरु आहेत. त्या मधील बहुसंख्य विद्यार्थी हे आदिवासी आहेत. बंदरपट्टीतील गावांमध्ये विविध जाती-धर्माचे लोक राहतात. परंतु येथील पालकांचा पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाठवण्याचा कल वाढला आहे. या शाळेत पाठविल्याने सामाजिक दर्जा वाढतो असा त्यांचा समज आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नरपड शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग असून एकूण ८६ चा पट आहे. मात्र १९०६ साली स्थापन झालेल्या या शाळेत तीन विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थी आदिवासी व माह्यावंशी समाजातील आहेत.या गावची लोकसंख्या सुमारे सात हजार असून वाढवळ, मांगेला, भंडारी, ख्रिस्ती आदी बिगर आदिवासी समुदाय राहतात. मात्र पाल्याला जि. प. च्या शाळेतील शिक्षण द्यायला एकही ग्रामस्थ तयार नाही. हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने अन्य गावातही दिसून येते. त्यामुळे आगामी काळात मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांनाही कमी पटसंख्येचा फटका बसणार आहे. त्यामुळे आदीवासी विद्यार्थी शिक्षणाला मुकण्याची शक्यता आहे.शासकीय कर्मचाºयांची मुलेच इंग्रजी शाळेतया शाळा शहरी भागात असून प्रवेश व मासिक फी, प्रवासभाडे, गणवेश आणि खाजगी शिकवणीकरीता खूप मोठी रक्कम मोजत आहेत. बहुतेक शासकीय अधिकारी व कर्मचारी पाल्याला जिल्हा परिषद शाळेत पाठवत नाहीत. त्या मध्ये माध्यमिक आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीVasai Virarवसई विरार