विरार : शनिवारी पहाटे एका तरुणाचा मृतदेह धानीव बाग तलावानजीक आढळून आला. या तरुणाला पहाटे घरातून अज्ञात व्यक्तींनी बोलावून नेले होते. त्यांनीच त्याची हत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.नालासोपाराजवळील धानीव बाग परिसरात राहणाऱ्या संदीप मिश्रा (२०) याला शनिवारी पहाटे ३ वाजता काही अज्ञात व्यक्तींनी बोलावून नेले होते. सकाळी धानीव बाग तलावाजवळ संदीपचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर तीक्ष्ण हत्याराने भोसकल्याच्या खुणा दिसत आहेत. त्याची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. (वार्ताहर)
नालासोपाऱ्यात तरुणाची हत्या
By admin | Updated: November 6, 2016 02:00 IST