शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:41 IST

डहाणूतील शाळेचा उपक्रम; विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

डहाणू/बोर्डी : पारनाका येथील के. एल. पोंदा हायस्कूल आणि राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी फटाकेमुक्त दिवाळी जनजागृती अभियान राबविण्यात आले.

दिवाळी म्हटली की फटाके आलेच. पण, गेल्या काही वर्षांमध्ये आवाजाच्या फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आता केवळ शोभेचे फटाके वाजवण्याचा नवीन ट्रेंड येतो आहे. यातूनच हे फटाकेमुक्त दिवाळी अभियान समोर आले आहे. फटाके वाजवल्याने होणारे दुष्परिणाम सहा. शिक्षक बाळासाहेब चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी याबाबतची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. आपण फटाके फोडणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, फटाके फोडल्याने होणारे दुष्परिणाम सांगताना हवेचे प्रदूषण आणि आवाजाचे प्रदूषण टाळण्याचा निर्धार करण्यात आला. या आवाजामुळे होणाऱ्या त्रासापासून रुग्ण, लहान मुले आणि पशूपक्षी यांना मुक्ती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.फटाक्यासाठी पैसे खर्च न करता तेच पैसे वापरून अवांतर पुस्तके खरेदी करून ती स्वत: वाचून घरातील इतर सदस्यांना, नातेवाईकांना आणि मित्रांना देऊन वाचन चळवळ वाढवण्यासाठी योगदान देण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रविंद्र बागेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीDiwaliदिवाळी