पारोळ : दुचाकीस्वारांकडून होणाऱ्या महिलांच्या दागिन्यांच्या लुटीच्या घटना वसई, विरार, नालासोपारा या परिसरात घडत असतानाच आता शक्कल लढवून भोळ्याभाबड्या महिलांना लुबाडणारी टोळी वसई-विरार परिसरात सक्रिय झाली असून त्यांनी एका महिलेचे दागिने शक्कल लढवून लंपास केले.आमच्या शेठच्या घरी मोठा कार्यक्रम आहे. त्या निमित्ताने तेथे साड्यावाटप करणार आहेत. तुम्हालाही साडी मिळेल, पण जर शेठजींनी तुमच्या अंगावरील दागिने पाहिले तर ते तुम्हाला साडी देणार नाहीत, असे सांगून तीन भामट्यांनी चंदनसार रोड रेल्वे पटरी, विरार पूर्व येथे लुबाडले.चोरट्यांनी महिलचे दागिने व रोख असा ८० हजारांचा ऐवज पिशवीत काढून ठेवला. पिशवीत ऐवज नीट ठेवला आहे का, हे बघण्याच्या बहाण्याने महिलेच्या हातातील पिशवी घेऊनतिघांनी पोबारा केला. घटनेमुळे परिसरात भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
शक्कल लढवून महिलेला लुबाडले
By admin | Updated: July 13, 2015 03:09 IST