शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; संतप्त जमावानं कार फोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 12:38 IST

अर्नाळा येथील घटना, मुळची ही महिला डहाणू तालुक्यातील मुरबाड पोस्ट वैती येथील असून पोटाची खळगी भरण्यासाठी ती वेठबिगारी मजूर म्हणून काम करण्यासाठी वसईत आली होती.

मंगेश कराळे

नालासोपारा :- कामावरून घरी जाणाऱ्या एका ६५ वर्षीय महिलेला भरधाव वेगातील XUV 500 ने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी अर्नाळा राजोडी रस्त्यावर घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने त्या गाडीची तोडफोड केली आहे. या घटनेची माहिती मिळताच अर्नाळ्याचे सहायक पोलिस निरीक्षक रुपेश दळवी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत पोहचून जमावाला शांत केले. अर्नाळा पोलिसांनी फेटलचा गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतले आहे.

शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास मथुरा दयात (६०) आणि नवशी बसवंत (६५) या दोघीही कामावरून घरी राजोडी ते सत्पाळा रोडने चालत चालल्या होत्या. त्यावेळी एका भरधाव XUV 500 च्या गाडीने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या नवशी यांना जोरदार धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत  झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने गाडीतील चालकाला बेदम मारहाण करून गाडीची तोडफोड केली. मृत महिला नवशी या सत्पाळा नाका ग्रामपंचायत कार्यालयामागे राहत होती. मुळची ही महिला डहाणू तालुक्यातील मुरबाड पोस्ट वैती येथील असून पोटाची खळगी भरण्यासाठी ती वेठबिगारी मजूर म्हणून काम करण्यासाठी वसईत आली होती.

मृत महिलेचा मृतदेह अर्नाळा पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेऊन विरारच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याबाबत अर्नाळा पोलीस ठाण्यात महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक कुलदीप मिश्रा याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात