शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बविआची निर्विवाद सत्ता महायुती रोखणार का? बविआ-मविआ एकत्र आल्याने होणार थेट लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 07:57 IST

अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाचे जागावाटप निश्चित झालेले नाही, बविआ-मविआने मनसेलाही घेतले सोबतीला

- मंगेश कराळेलोकमत न्यूज नेटवर्कवसई-विरार : महापालिकेवरील बविआची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजप-शिंदेसेनेने महायुतीत लढण्याचे जाहीर केले आहे. तर विधानसभेत भाजपला मिळालेले यश पाहता त्यांना रोखण्यासाठी एकहाती सत्ता असणाऱ्या बविआने मविआसोबत युती जाहीर केल्याने निवडणुकीत महायुती की नवी आघाडी बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  

 बविआ व मविआने मनसेलाही घेतले आहे. त्यामुळे मनसेला काही जागा सोडाव्या लागतील. मराठी पट्ट्यात मनसेचे तर ख्रिश्चन व मुस्लीम पट्ट्यात काँग्रेसचे वर्चस्व असल्याने त्यांना जास्त  जागा सोडाव्या लागतील. मात्र अद्याप जागावाटप जाहीर झालेले नाही.

एमआयएमचीही तयारीजिल्ह्यात नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकमेकांना आव्हान देत स्वतंत्रपणे निवडणुका लढविलेले महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना वसई-विरार महापालिका काबीज करण्यास एकत्र आले. एमआयएमनेही निम्म्या जागा लढविण्याची तयारी सुरू केली असून, त्याचा परिणाम कोणावर होणार याकडे लक्ष लागले आहे. 

यावेळी प्रचारात कोणते मुद्दे ठरू शकतात निर्णायक? 

शहरात दररोज होणारी वाहतूककोंडी, मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, उड्डाणपूल, अनधिकृत बांधकामे, शास्ती घरपट्टी, रस्ते, गटारे, पावसाळ्यात शहरात साचणारे पावसाचे पाणी, फेरीवाला धोरण, वाहने पार्किंग समस्या आदी मुद्दे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत बविआचे तिन्ही आमदार झाले होते पराभूत 

गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत बविआने महाविकास आघाडी किंवा मनसेसोबत युती न करता स्वतंत्र निवडणूक लढविल्याने त्यांचे तिन्ही आमदार पराभूत झाले होते. वसई विधानसभेतून माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांना ३२०० मतांनी पराभव पत्करावा लागला होता.यामुळे हितेंद्र ठाकूर यांनी पालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी महाविकास आघाडीसह मनसेला एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याचे ठरवले. 

तब्बल १० वर्षांनी होतेय निवडणूक२००९ साली वसई विरार महापालिकेची स्थापना झाली. सन २००९ आणि त्यानंतर २०१५ मध्ये ११५ नगरसेवक पदांसाठी वॉर्ड रचनेनुसार निवडणूक घेण्यात आली होती. २०२० साली निवडणूक होणे अपेक्षित होते, मात्र तेव्हा कोरोनामुळे निवडणूक स्थगित झाली. त्यानंतर आता तब्बल १० वर्षांनी महापालिकेची निवडणूक होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Will BVA's Unchallenged Rule Be Halted? MVA Alliance Creates Direct Contest

Web Summary : Vasai-Virar faces a key municipal election after 10 years. BJP-Shinde Sena alliance challenges BVA's dominance. BVA aligns with MVA, including Congress and possibly MNS, creating a direct fight. Key issues: traffic, healthcare, unauthorized construction. MIM's participation adds another layer.
टॅग्स :Vasai Virar Municipal Corporation Electionवसई विरार महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६