शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या मुलांची नावे होणार हजेरीपटावरून कमी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 06:39 IST

तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या ॲटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल (एईसीएस)मध्ये शिक्षण घेत असलेल्या अक्करपट्टी व पोफरणच्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मुलांची फी ३१ मार्चपर्यंत न भरल्यास हजेरीपटावरून त्यांची नावे कमी करणार असल्याचे पत्र शाळेतून देण्यात आले आहे.

- पंकज राऊतबोईसर - तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या ॲटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल (एईसीएस)मध्ये शिक्षण घेत असलेल्या अक्करपट्टी व पोफरणच्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या मुलांची फी ३१ मार्चपर्यंत न भरल्यास हजेरीपटावरून त्यांची नावे कमी करणार असल्याचे पत्र शाळेतून देण्यात आले आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त ३१ मार्चला शाळेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याच्या विचारात आहेत. मात्र या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.तारापूर अणुऊर्जा प्रकल्प तीन व चारच्या उभारणीसाठी अक्करपट्टी व पोफरण या दोन गावांतील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी घेताना त्यावेळी अधिकाऱ्यांनी तुम्हाला अणुऊर्जा केंद्रात कायमस्वरूपी नोकरी तर तुमच्या मुलांना भविष्यात ॲटोमिक एनर्जी स्कूलमध्ये मोफत शिक्षण मिळेल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून प्रकल्पग्रस्तांनी राहती घरे आणि सोन्यासारख्या शेतजमिनी दिल्या. मात्र ही दोन्ही आश्वासने पाळली न गेल्याने प्रकल्पग्रस्तांची घोर निराशा झाली आहे. एईसीएस शाळेमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या ठराविक मुलांनाच प्रवेश दिला जातो, तर कायमस्वरूपी नोकरी, मोफत शिक्षण सर्व सुविधा अशी अनेक आश्वासने देऊन आमची फसवणूकच अणुऊर्जा प्रशासनाने केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त करीत आहेत. फीबद्दल प्रकल्पग्रस्त पालकांनी आवाज उठवून निवेदने दिली, बैठका घेतल्या, त्यावेळी लोकप्रतिनिधींसमोर प्रकल्प अधिकारी फीमाफीचे बोलतात, मात्र दुसरीकडे शाळेतर्फे जर तुम्ही फी भरली नाही तर मुलांची नावे काढून टाकण्यात येतील. ९ वी, १०वीच्या मुलांचे रजिस्ट्रेशन होणार नाही, अशा प्रकारच्या बाबी सांगून पालकांना जेरीस आणले जात असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. जऱ आपल्या मुला-मुलींना शाळेतून काढून टाकले तर मधील शाळेसमोर आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नसल्याची भावना प्रकल्पग्रस्तांमधून व्यक्त होत आहे. देशाच्या विकासासाठी आम्ही आमच्या दोन्ही गावांचे बलिदान देऊन पारंपरिक व्यवसायावर नांगर फिरवला असताना आमचे योग्य पुनर्वसन केले नाही. कायमस्वरूपी नोकरीऐवजी कंत्राटी काम आणि बेरोजगारीचे जिणे प्रकल्पग्रस्त जगत आहेत. निदान आमच्या मुलांची फी ही विशेष बाब म्हणून भरावी अथवा माफ करू शकत नाही का? तसेच आमचे बलिदान कवडीमोल होते का? असा सवाल प्रकल्पग्रस्त विचारत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र