शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील ‘हरित पट्टा’ उद्ध्वस्त होणार? घनकचरा, सांडपाणी प्रकल्प अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 00:29 IST

पालिकेचा भोंगळपणा आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता यामुळे लवकरच हरित वसई प्रदूषित आणि धोकादायक शहर बनेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे

- मंगेश कराळेनालासोपारा - निसर्गाने बहरलेली, समृद्ध वनराईने सजलेली अशी वसईची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षात वसईचा हा ‘हरित पट्टा’ उद्ध्वस्त होत चालला आहे. पालिकेचा गलथानपणा आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता यामुळे लवकरच हरित वसई प्रदूषित आणि धोकादायक शहर बनेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.वसईच्या डम्पिंग ग्राऊंडचे घनकचरा व्यवस्थापन होत नसले तरी प्रदूषण मंडळ पालिकेला पाठीशी घालत आहे. दुसरीकडे दरदिवशी कोट्यवधी लिटर सांडपाणी प्रक्रिया न करताच समुद्रात सोडले जात आहे. सर्वसामान्यांशी निगडित असलेला पर्यावरण अहवाल मागील तीन वर्षांपासून तयार झालेला नाही. यामुळे हरित वसईची वाटचाल बकाल वसईच्या दिशेने सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी केला आहे.वसई-विरार महापालिकेचे गोखिवरे येथे १९ हेक्टर जागेवर डम्पिंग ग्राऊंड आहे. २०१४ मध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घनकचरा प्रकल्पासाठी ५० एकर जागा नि:शुल्क दिली होती. आज महापालिकेच्या स्थापनेला १० वर्ष पूर्ण होऊनही गोखिवरे येथील घनकचरा प्रकल्पात निरंक (०%) ही प्रक्रिया केली जात नाही. सध्या वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात दररोज ८०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेने ४१३ कोटींचा प्रकल्प आखला होता. मात्र त्याची अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. या कचºयाचे वर्गीकरण होत नाही, मिथेन गॅस, जैवइंधन (बायोगॅस) तसेच खत तयार केले जात नाही. परिणामी या कचºयाचे डोंगर दिवसेंदिवस वाढत आहेत. कचºयाच्या दुर्गंधीमुळे परिसरातील अनेक भागात साथीचे आजार पसरले असून आरोग्याच्या भीषण समस्या निर्माण झालेल्या आहेत. कचरा नष्ट करण्यासाठी आगी लावल्या जातात, मात्र त्या धुराने श्वसनाचे अनेक विकार जडले आहेत. कचरा कुजल्यानेही असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.पालिका घनकचरा व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरत असतान दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाकडून खोटा अहवाल सादर करून पालिकेची पाठराखण केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दरवर्षी नागरी घनकचरा व्यवस्थापन अहवाल सादर करते. मंडळाच्या २०१८ च्या अहवालानुसार महापालिका क्षेत्रात तर दरदिवशी ६३० मेट्रिक टन कचºयाची निर्मिती होते. मात्र सध्या ८०० मेट्रिक टन कचरा तयार होत असताना आजही ६३० मेट्रिक टन कुठल्या आधारावर सांगते असा सवाल भट यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलेल्या अहवालात पालिका वातावरणीय हवा मोजणी करत असल्याचे नमूद केले आहे. तर दुसरीकडे वायुरूप पदार्थाचे नमुने नसल्याचे सांगते. हा विरोधाभास असल्याचे भट यांनी सांगितले. पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर हवेची चाचणी करणारी यंत्रणा नसल्याचे पालिकेने माहिती अधिकारात सांगितले आहे. तरी प्रदूषण मंडळ अशी यंत्रे असल्याचे धडधडीत खोटे आपल्या अहवालात म्हणते. प्रदूषण मंडळाचा हा अहवाल चुकीचा असून तो पालिकेला पाठीशी घालणारा आहे, असेही भट यांनी सांगितले.सांडपाणी प्रकल्प फक्त कागदावरच, समुद्रकिनारेही प्रदूषितवसईचे सागरी किनारे प्रदूषित होण्यामागे घरगुती आणि शहरांतर्गत सांडपाण्याचे मुख्य कारण आहे. या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वसई-विरारमध्ये ठिकठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारणे अत्यंत आवश्यक आहे, मात्र उपाययोजना झालेली नाही, असा आरोप आहे.वसई-विरार महापालिका परिसरातील असंख्य झोपडपट्ट्यांमधील, चाळींमधील सांडपाणी आणि मलजल थेट नाल्यांमध्ये सोडण्यात आले आहे. नाल्यांमधून ते थेट समुद्राला जाऊन मिळते. वसई-विरारमध्ये फक्त विरारमधील बोळिंज येथे पालिकेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे.संपूर्ण वसई-विरारमध्ये फक्त एकच प्रक्रिया केंद्र असल्याने बाकीच्या ठिकाणाहून निघणारे सांडपाणी आणि मलजलामध्ये अपायकारक घटक कायम राहतात व ते तसेच समुद्रात सोडले जातात. या अपायकारक घटकांमुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.याचा फटका अखेरीस अरबी समुद्रालाच बसून सागरी प्रदूषणात मोठी भर पडते. तसेच वसई-विरार परिसरातून प्रत्येक दिवशी १८४ दशलक्ष लिटर सांडपाणी समुद्रात सोडण्यात येते. ज्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही, ही माहिती ‘माहितीच्या अधिकारा’तून उघड झाली आहे.सदर सामाजिक कार्यकर्त्याने केलेले आरोप हे अत्यंत चुकीचे असून ते बिनबुडाचे आहेत. आपण स्वत: येऊन प्रत्यक्षात पाहणी करावी. सांडपाण्याच्या प्रकल्प हा भारतातील अनेक प्रकल्पांपैकी एक असून तो अतिशय चांगला चालत असून जेवढे घाण पाणी प्रकल्पात सोडतो, ते व्यवस्थित फिल्टर होते. शहरातील साफसफाई व्यवस्थित होत असून पर्यावरण अहवाल आता बनवायला घेतला असून मागे तो बनला नव्हता.- माधव जवादे,शहर अभियंता, वसई-विरार शहर महानगरपालिकावसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. शहरात प्रदूषणाची समस्या वाढत आहे. वसईची हवा आणि पाणी प्रदूषित झाली असून वसईतील नागरिकांना दररोज विविध संसर्गजन्य आजारांची लागण होत आहे, ही चिंतेची बाब आहे.- चरण भट,सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Vasai Virarवसई विरारenvironmentपर्यावरण