शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जिल्ह्यातील मच्छीमारांना मिळणार दिलासा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 00:51 IST

आमदार श्रीनिवास वणगा ह्यांनी पालकमंत्री तथा कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेत आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छीमारांना तात्काळ रक्कम मिळवून देण्याची मागणी केली.

पालघर : जिल्ह्यातील मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी दरम्यान वापरलेल्या डिझेलवर मिळणाऱ्या ७ कोटी ४० लाखाच्या परताव्याची रक्कम एप्रिल २०१८ पासून अडकली आहे. त्यातील फक्त ९८ लाखाचीच रक्कम शासनाकडून मिळाल्याने पालघर जिल्ह्यातील मच्छीमार आर्थिक संकटात सापडला होता. याबाबतच्या लोकमतच्या वृत्ताची दखल घेत आमदार श्रीनिवास वणगा ह्यांनी पालकमंत्री तथा कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेत आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छीमारांना तात्काळ रक्कम मिळवून देण्याची मागणी केली.पालघर जिल्ह्यातील वसई ते झाई-बोर्डीदरम्यान एकूण ४५ मच्छीमार सहकारी संस्था असून पालघर तालुक्यात सर्वाधिक २४, वसई तालुक्यात १०, डहाणू तालुक्यात ९ तर तलासरी तालुक्यात २ सहकारी संस्था कार्यरत आहेत. या ४५ संस्थांच्या माध्यमातून सुमारे २ ते ३ हजार लहान मोठ्या मच्छीमार बोटी कार्यरत आहेत. या बोटींना समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी डिझेल, आॅइल, बर्फ, जाळी आदी साहित्याचा पुरवठा केला जातो. मच्छीमार आपल्या खिशातील पैसे खर्च करून हे साहित्य खरेदी करीत असतात. वर्षाकाठी वापरलेल्या डिझेलवर परतावा मिळत असतो. त्याप्रमाणे जिल्ह्यातील ४५ सहकारी संस्थांचा एप्रिल २०१८ पासून अडकवून ठेवलेला ७ कोटी ४० लाखाचा परतावा मिळावा अशी मागणी सहकारी संस्थांनी आजी-माजी मुख्यमंत्री, मत्स्यव्यवसाय मंत्री आदींकडे केली आहे.२०१९-२० या आर्थिक वर्षात मच्छीमार आणि डिझेल तेलावरील परताव्यासाठी एकशे दहा कोटीच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. मात्र त्यापैकी अवघ्या ४८ कोटी निधीचे वितरण करण्यात आले असल्याचे मच्छीमार सहकारी संस्थांचे म्हणणे आहे. उर्वरित ६५ कोटींपैकी ३० कोटीचा निधी जिल्हानिहाय वितरीत करण्यात आला. रायगड जिल्ह्याला ८ कोटी १५ लाख, रत्नागिरीला सहा कोटी ९५ लाख, मुंबई शहराला ६ कोटी ६२ लाख, मुंबई उपनगरला ६.६८ कोटी, ठाण्याला ५० लाख, पालघरला ७ कोटी ४९ लाख रुपयांची मागणी असताना अवघे ५० लाख रुपये देऊन त्यांची बोळवण करण्यात आली होती.>डिझेल खरेदीसाठी आपल्याजवळील रोख रक्कम भरूनही त्यावरील परतावा दोन-दोन वर्षे अडवून ठेवला जात असल्याने आणि रक्कम हवी असल्यास एकूण रकमेपैकी दोन टक्के रकमेची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी सहकारी संस्थांकडून केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर अनेकदा मागणी केल्यानंतरही रक्कम दिली जात नाही. सातपाटी येथे सर्वोदय सहकारी संस्थेने खा. राजेंद्र गावित आणिआ. वणगा यांना आमंत्रित केले होते. त्या चर्चेच्या अनुषंगाने वणगा यांनी कृषीमंत्री भुसे यांची भेट घेत माहिती दिली. मंत्र्यांनी तत्काळ मत्स्यव्यवसाय विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमार यांच्याशी संपर्क साधून सर्व सहकारी संस्थांच्या रक्कमांचे लवकर वितरण करण्याचे आदेश दिले आहेत.